शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

पाकिस्तानवर माझं भारताइतकंच प्रेम- मणिशंकर अय्यर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 8:37 AM

परवेझ मुशर्रफ यांच्या धोरणाचा आदर्श बाळगा

कराची: भारत आणि पाकिस्तान हे देश सख्खे शेजारी आहेत. त्यामुळे मी भारताइतकंच प्रेम पाकिस्तानवरही करतो, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केले आहे. अय्यर यांच्या या वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद पेटण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीही अय्यर यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेसला अडचणीत आणले होते. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपाला याचा फायदा झाला होता. त्यानंतर अय्यर यांचे नवे वक्तव्य पुन्हा एकदा काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते. गेल्या आठवड्यात त्यांनी कराची येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी मणिशंकर अय्यर यांनी म्हटले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चा अखंडपणे सुरू राहणे, ही काळाची गरज आहे. याबाबत पाकिस्तानची सध्याची भूमिका सकारात्मक असली तरी भारताकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. परंतु, भारत-पाकिस्तान यांच्यातील वाद सोडवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. त्यासाठी दोन्ही देशांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवरील चर्चा अव्याहतपणे सुरूच राहिली पाहिजे, असे अय्यर यांनी सांगितले. तसेच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांवर आपले सारखेच प्रेम असल्याचेही त्यांनी म्हटले. मी भारतावर प्रेम करतो म्हणूनच माझे पाकिस्तानवरही प्रेम आहे. भारतानेही शेजारधर्माचे पालन करून पाकिस्तानवर प्रेम करावे, असा सल्लाही यावेळी अय्यर यांनी दिला. यावेळी अय्यर यांनी भारत-पाक द्विपक्षीय चर्चेसंबंधात मोदी सरकारच्या भूमिकेविषयीही अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. काश्मीर आणि भारतातील दहशतवाद हे द्विपक्षीय चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या काळात अवलंबण्यात आलेल्या धोरणाचा अवलंब करावा, असेही अय्यर यांनी सांगितले.  

टॅग्स :Mani Shankar Aiyarमणिशंकर अय्यरcongressकाँग्रेसPakistanपाकिस्तान