शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

I love her reasons... उद्योगपती हर्ष गोयंकांनाही 'त्या' मुलीचा व्हिडिओ 'लाईक'

By महेश गलांडे | Updated: February 25, 2021 15:01 IST

कोरोना कालावधीतील वर्क फ्रॉम होमची संकल्पना अनेक कर्मचाऱ्यांना आवडू लागली आहे. अशा अनेक गोष्टीही आहेत ज्या ऑफिसमध्ये जाऊन काम करताना शक्य होत नाहीत, त्या घरून कर्मचाऱ्यांना करता येतात.

ठळक मुद्देवर्क फ्रॉम होम चांगलं असून पुन्हा ऑफिस सुरू न करण्याचंही ती म्हणते. देशातील नामवंत उद्योगजक हर्ष गोयंका यांनीही आपल्या ट्विटरवरुन या मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

मुंबई - कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. या कालावधीत अनेक कंपन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. यादरम्यान, कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा दिली होती. आता लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असला तरी अनेक जण अद्यापही वर्क फ्रॉम होमच करत आहेत. मात्र, अनेकांना घरातून पाय बाहेर काढावा लागत असून ऑफिसची वाट धरावी लागत आहे. त्यावरुनच, एका मुलीने वर्क फ्रॉम होम कसं चांगलय, याचा व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे, उद्योगपती हर्ष गोयंका यांनाही हा व्हिडिओ आवडला आहे.  

कोरोना कालावधीतील वर्क फ्रॉम होमची संकल्पना अनेक कर्मचाऱ्यांना आवडू लागली आहे. अशा अनेक गोष्टीही आहेत ज्या ऑफिसमध्ये जाऊन काम करताना शक्य होत नाहीत, त्या घरून कर्मचाऱ्यांना करता येतात. परंतु सध्या हळूहळू कार्यालयं मर्यादित कर्मचाऱ्यांच्या संख्येत सुरू होण्यासही सुरूवात झाली आहे. पण काही कर्मचाऱ्यांना अजूनही कार्यालयात जाण्याची इच्छा नसल्याचं दिसून येत आहे. अशातच एका महिला कर्मचाऱ्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.  सदर महिला ही या व्हिडीओत आपल्याला वर्क फ्रॉम होमची सवय झाल्याचं सांगत आहे. तसेच कार्यालय बंद असल्यामुळे कार्यालयात येताना घालत असलेले सर्व कपडेही बांधून ठेवल्याचं ती सांगते. वर्क फ्रॉम होम चांगलं असून पुन्हा ऑफिस सुरू न करण्याचंही ती म्हणते. देशातील नामवंत उद्योगजक हर्ष गोयंका यांनीही आपल्या ट्विटरवरुन या मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, या मुलीने सांगितलेल्या कारणांच्या मी प्रेमात पडलोय, असे त्यांनी म्हटलंय. एका कर्मचाऱ्याच्या मनातील भावना या व्हिडिओतून दिसून आल्यानंतर उद्योजक असलेल्या हर्ष गोयंका यांनीही या व्हिडिओला लाईक केलंय. त्यामुळे, खरच तिच्या मतांचा विचार केला जाईल का, असा प्रश्न चर्चेला येत आहे. 

दरम्यान, हा व्हिडीओ इन्स्टाग्रामपासूनफेसबुकपर्यंतसोशल मीडियावर सर्वत्र धुमाकुळ घालत आहे. सर्वकाही चांगलं चालत आहे. कंपनीचा महसूलही वाढत आहे, पैसेही वाचत आहेत. तर अशा परिस्थितीत पुन्हा ऑफिस का सुरू करताय असंही ती या व्हिडीओतून विचारत आहे. तसंच आता कुर्ता आणि पायजम्यात राहण्याची आपल्याला सवय झाली आहे आणि आता आपल्याला इतर काही शक्य होणार नाही. जे लोकं म्हणतायत की आम्ही ऑफिसला मीस करतोय त्यांनी दुसऱ्यांना मुर्ख बनवावं असंही ती महिला म्हणत आहे. दरम्यान, आपण हा व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी बनवल्याचंही तिनं व्हिडिओच्या अखेरिस म्हटलं आहे. मात्र, हर्ष गोयंका यांनी तिची कारणं आपल्याला आवडल्याचं सांगितलंय. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाViral Photosव्हायरल फोटोज्corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई