'रिकाम्या बोगद्यात कुणाकडे पाहून हात उंचावला, मोदींची तब्येत बरी आहे ना?'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 05:16 PM2020-10-05T17:16:47+5:302020-10-05T17:19:42+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटल टनेलचे उद्घाटन केले. यावेळी मोदींनी सांगितले की, अटल बोगद्यामुळे भारताच्या सीमेवरील पायाभूत सुविधांना नवी शक्ती मिळेल.

"I looked at someone in the tunnel and raised my hand. Is Modi in good health?", prakash ambedkar | 'रिकाम्या बोगद्यात कुणाकडे पाहून हात उंचावला, मोदींची तब्येत बरी आहे ना?'

'रिकाम्या बोगद्यात कुणाकडे पाहून हात उंचावला, मोदींची तब्येत बरी आहे ना?'

Next
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटल टनेलचे उद्घाटन केले. यावेळी मोदींनी सांगितले की, अटल बोगद्यामुळे भारताच्या सीमेवरील पायाभूत सुविधांना नवी शक्ती मिळेल.

नवा दिल्ली : हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीत खोदण्यात आलेल्या अटल बोगद्यामुळे भारताची सीमेवरील शक्ती वाढेल, असे प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी या बोगद्याचे उद्घाटन करताना शनिवारी केले. या बोगद्याच्या उद्घाटनासाठी जाताना, बोगद्यामध्ये पंतप्रधाननरेंद्र मोदी कोणाकडे पाहून हात उंचावत होते, असा प्रश्न आंबेडकर यांनी विचारला आहे. तसेच, मोदींची तब्येत बरी आहे ना?, असा खोचक टोलाही आंबेडकर यांनी लगावला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटल टनेलचे उद्घाटन केले. यावेळी मोदींनी सांगितले की, अटल बोगद्यामुळे भारताच्या सीमेवरील पायाभूत सुविधांना नवी शक्ती मिळेल. सीमेवरील पायाभूत सुविधांत सुधारणा करण्याची मागणी दीर्घकाळापासून होत होती. तथापि, हे प्रकल्प मार्गीच लागत नव्हते. अनेक प्रकल्प नियोजनाच्या पातळीवरच रखडले होते. काही प्रकल्प अर्ध्यावर लटकले होते. सीमा भागातील दळवळण व्यवस्थेचा मुद्दा थेट देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. सीमेवर गस्त घालणाऱ्या सुरक्षा दलांना अशा प्रकल्पांमुळे रसद पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. विरोधकांनी देशाच्या संरक्षण हिताकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याचा आरोप करून ते म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी या बोगद्याचे भूमिपूजन केले होते.

मोदींनी या बोगद्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी बोगद्यात गेल्यानंतर नेहमीप्रमाणे हात उंचावून अभिवादन केले. मात्र, बोगद्यात कुणीही नसताना मोदींनी नेमकं अभिवादन कोणाला केलं? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. निर्मनुष्य असलेल्या बोगद्यात कोणाकडे पाहून नरेंद्र मोदी हात उंचावत होते. तेथे तर जनता उपस्थित नव्हती?. देशाला अनर्थतेच्या खाईत घेऊन जाणाऱ्या पंतप्रधानांच्या आरोग्यावर परिणाम तर झाला नाही ना? जनतेला पीएम मोदींच्या प्रकृतीची माहिती मिळायलाच हवी, विशेष म्हणजे यापूर्वीही अनेकदा आदरणीय महोदयांनी अनेकदा असं केलं आहे, असे ट्विट प्रकाश आंबडेकर यांनी केले आहे. आंबेडकर यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. 

...असा आहे बोगदा
अटल बोगदा मनालीजवळील सोलांग खोरे आणि लाहौल स्पिती जिल्ह्यातील सिस्सू यांना जोडतो. ३ हजार मीटर उंचीवर असलेला हा बोगदा ९.0२ कि. मी. लांब असून तो जगातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग बोगदा ठरला आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंग, लष्करप्रमुख बिपीन रावत आणि हवाई दल प्रमुख एम. एम. नरवणे यांची यावेळी उपस्थिती होती. रोहतांग खिंडीच्या पश्चिमेला डोंगर पोखरून हा बोगदा तयार करण्यात आला असून त्यामुळे सोलांग आणि सिस्सूमधील अंतर ४६ किमींनी कमी होणार आहे. चार तासांचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटांत होईल. दुहेरी मार्गिका असलेल्या बोगद्यातून रोज ३ हजार कार आणि १,५00 ट्रक ताशी कमाल ८0 कि. मी. वेगाने ये-जा करू शकतील.

Web Title: "I looked at someone in the tunnel and raised my hand. Is Modi in good health?", prakash ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.