शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 06:45 IST

भारतीय बॅडमिंटनपटूंना दुखापतीतून सावरून पुनरागमन करताना झुंजावे लागते. यावर सायना म्हणाली की, केवळ भारतीयच नाही, तर अनेक विदेशी खेळाडूंनाही पुनरागमन करताना झुंजावे लागते.

रोहित नाईकलोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘गुडघादुखापतीमुळे मला दीर्घकाळ खेळापासून दूर राहावे लागले होते. बॅडमिंटन कोर्टवर पुनरागमन केले, तरी पुन्हा उच्च स्तरावर खेळणे आव्हानात्मक ठरेल. शिवाय, सध्या मी खेळणेही सोडले आहे,’ असे ऑलिम्पिक पदक मिळवणारी भारताची पहिली बॅडमिंटनपटू ‘फुलराणी’ सायना नेहवाल हिने ‘लोकमत’ला सांगितले. सायनाच्या उपस्थितीत येथे शनिवारी सीएक्सओ पिकलबॉल स्पर्धा रंगली. यावेळी तिने प्रस्तुत प्रतिनिधीशी संवाद साधला.

निवृत्तीनंतरचा खेळ म्हणून पिकलबॉलकडे पाहू नका. हा एक उच्च स्तराचा खेळ आहे. यामध्ये मोठी स्पर्धा आहे. मी अनेक खेळाडूंना यामध्ये दुखापतग्रस्त होतानाही पाहिले आहे. या खेळामध्ये कारकीर्द घडविण्याची मोठी संधी आहे. शरीर साथ देत असेल, तर नक्कीच खेळाडूंनी आपापल्या खेळातून निवृत्त झाल्यानंतर हा खेळ खेळावा.- सायना नेहवाल

सायना सध्या खेळापासून दूर असली, तरी तिने अद्याप निवृत्तीबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. 

पुनरागमनासाठी इच्छाशक्ती, सकारात्मकता महत्त्वाची 

भारतीय बॅडमिंटनपटूंना दुखापतीतून सावरून पुनरागमन करताना झुंजावे लागते. यावर सायना म्हणाली की, केवळ भारतीयच नाही, तर अनेक विदेशी खेळाडूंनाही पुनरागमन करताना झुंजावे लागते. स्पेनच्या कॅरोलिन मरिनला एकच दुखापत तीनवेळा झाली. तीदेखील झुंजत आहे.  इच्छाशक्तीवर बरेच काही अवलंबून आहे. त्यामुळे सकारात्मक मानसिकता महत्त्वाची आहे. पुनरागमनानंतर आपण पूर्वीप्रमाणेच खेळू शकू की नाही, असा प्रश्न खेळाडूंना असतो. शिवाय पुन्हा दुखापत होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे केवळ इच्छाशक्ती असावी.

चिराग-सात्विक आणतील ऑलिम्पिक पदक 

चिराग शेट्टी-सात्विकसाईराज रंकीरेड्डी या भारताच्या स्टार जोडीबाबत सायना म्हणाली की, चिराग-सात्विक खूप चांगली कामगिरी करत आहेत. भविष्यात त्यांच्याकडून नक्कीच ऑलिम्पिक पदक मिळू शकेल. पुढच्या वर्षी आशियाई स्पर्धेत चमकदार कामगिरी करून ते पुढे विश्वविजेतेपदही पटकावतील. ही जोडी इतकी मजबूत आहे की, ते कोणतीही स्पर्धा जिंकू शकतात. पण, प्रत्यक्षात कोर्टवर कसा खेळ होतो, यावर सर्व अवलंबून आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Saina Nehwal: 'Currently, I've stopped playing!' What did she say?

Web Summary : Saina Nehwal reveals she has stopped playing due to injury challenges, making a high-level comeback difficult. She emphasizes the importance of willpower for returning athletes and predicts Olympic success for Chirag-Satwik.
टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालIndiaभारतBadmintonBadminton