I Had Never Spoken Like That; Amit Shah's U-Turn From A Statement On The Imposition of Hindi Language | मला तसं म्हणायचं नव्हतं; 'त्या' भाषेच्या विधानावरून अमित शाहांचा यू-टर्न
मला तसं म्हणायचं नव्हतं; 'त्या' भाषेच्या विधानावरून अमित शाहांचा यू-टर्न

नवी दिल्ली: भारतात हिंदी दिवसाच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा यांनी एक देश, एक भाषा असे देशवासीयांना आवाहन केले होते. मात्र या आवाहनानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीसह अनेक नेत्यांनी विरोध दर्शविला होता. मात्र आता सर्व स्तरावरतून विरोध करण्यात आल्यानंतर अमित शहा यांनी मी हिंदी भाषा सक्ती करण्याबाबत वक्तव्य केलचं नसल्याचे म्हणत निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.  

अमित शहा म्हणाले की, मी कोणत्याही प्रादेशिक भाषांवर हिंदी भाषा लादण्याचे वक्तव्य केले नाही. तसेच मी हिंदी भाषिक राज्यात राहत नाही, तर गुजरातला राहतो. मी फक्त मातृभाषेनंतर हिंदी भाषा शिकण्याचा आग्रह केला होता. त्याचप्रमाणे ज्या राजकीय नेत्यांना या विषयावर राजकारण करायचं आहे ते करु शकतात असं देखील त्यांनी विरोधकांना सांगितले आहे. 

हिंदी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जात असल्याने तीच देश एकसंध ठेवू शकते या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर भाजपचे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा, असदुद्दीन ओवेसी, कमल हासन आदींनी टीका केली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही शहा यांच्यावर निशाणा साधत भारतात हिंदीव्यतिरिक्त बोलल्या जाणाऱ्या प्रादेशिक भाषा हा दुबळेपणा नाही असे स्पष्ट केले होते. त्याचप्रमाणे भाजप नेते व कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी कन्नड भाषेची भलामण केली होती. कन्नड संस्कृती जपणे हे आमचे कर्तव्य आहे असे सांगून त्यांनी अमित शहा यांच्या हिंदी लादण्याला विरोध केला होता. 
 
दरम्यान, हिंदी दिनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी शनिवारी 'एक देश एक भाषा' या धोरणाला समर्थन केल्यामुळे पुन्हा हा वाद उफाळून आला आहे. अनेक भाषा आपल्याला देशाची मोठी ताकद आहे. मात्र, देशाची एक भाषा गरजेची आहे, कारण विदेशी भाषांना स्थान मिळणार नाही. देशाची एक भाषा लक्षात घेऊन आपल्या पुर्वजांनी राजभाषेची कल्पना केली होती आणि राजभाषेच्या रुपाने हिंदी स्वीकारली होती. त्यामुळे हिंदी भाषेला प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य आहे, असे हिंदी दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अमित शाह यांनी म्हटले होते.

Web Title: I Had Never Spoken Like That; Amit Shah's U-Turn From A Statement On The Imposition of Hindi Language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.