मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 10:34 IST2025-08-08T10:34:16+5:302025-08-08T10:34:39+5:30
रिंकी अहिरवार नावाच्या महिलेने हा दावा केला आहे. महिलेच्या गर्भात सापाची पिल्ले कशी आली, यावरून आजुबाजुच्या गावातील लोक वेगवेगळ्या चर्चा करू लागले आहेत.

मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील मउ मसानिया गावातीच एका महिलेने सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिल्याचा दावा केला आहे. तिच्या पोटाच प्रचंड दुखत होते. सहन होत नव्हते, घरात एका भांड्याखाली सापासारखे जीव झाकून ठेवण्यात आले होते. याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
हा धक्कादायक प्रकार बाहेर समजताच त्या घरासमोर लोकांची गर्दी होऊ लागली आहे. रिंकी अहिरवार नावाच्या महिलेने हा दावा केला आहे. महिलेच्या गर्भात सापाची पिल्ले कशी आली, यावरून आजुबाजुच्या गावातील लोक वेगवेगळ्या चर्चा करू लागले आहेत.
सापासारखे दिसणारे जीव या महिलेच्या घरात आहेत. जो कोणी ही पिल्ले पाहणार तो मरून जाणार असे ही महिला सांगत आहे. तिच्या पोटात जोराचे दुखू लागले होते, यानंतर ही पिल्ले बाहेर पडल्याचे तिने सांगितले. जेव्हा लोक पहायला आले तेव्हा तिने पाहणारे मरतील, असे म्हटले आहे. परंतू, तिच्या या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवला नाही, तिचा आणि त्या सापासारख्या दिसणाऱ्या जिवाचा फोटो, व्हिडीओ अनेकांनी काढला आहे.
घरातील खोलीत हे साप पाहून तिचे कुटुंबीय देखील घाबरलेले आहेत. तिच्या पोटात दुखू लागले होते. या पिल्लांवर जन्मलेल्या बाळाच्या अंगावर जसे रक्त असले तसे रक्त देखील लागलेले आहे. कुटुंबीयांनी घाबरून रिंकीला राजनगरच्या आरोग्य केंद्रात नेले, तिथए तिच्यावर पोटदुखीचे औषध देण्यात आले. यानंतर छतरपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिथेही ती हेच सांगत आहे.