'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 09:02 IST2025-07-22T08:51:01+5:302025-07-22T09:02:30+5:30

सोमवारी रात्री उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी त्यांच्या प्रकृतीचे कारण देत राजीनामा देण्याची घोषणा केली.

I don't work under pressure Why did Jagdeep Dhankhar say this? Video goes viral after resignation | 'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल

'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती कारणास्तव संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वैद्यकीय सल्ल्यानुसार आपल्या पदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत असल्याचे सांगत त्यांनी राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. विरोधी पक्षांनी यावरुन आरोप केला आहे. 'जर त्यांची प्रकृती इतकी खराब असती तर त्यांनी दिवसा राज्यसभेच्या कामकाजात भाग घेतला नसता',असं विरोधी पक्षांनी म्हटले आहे. काँग्रेससह अनेक पक्षांच्या नेत्यांनी राजीनाम्यामागे दुसरे काही कारण असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

दरम्यान, धनखर यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही लोकजण त्यांचा व्हिडिओही शेअर करत आहेत. यामध्ये ते 'मी दबावाखाली काम करत नाही' असे म्हणताना दिसत आहेत. या व्हिडिओद्वारे अनेक लोक धनखड दबावाखाली होते हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय

ही घटना फक्त तीन आठवड्यांपूर्वीची आहे. जगदीप धनखड हे राजस्थान दौऱ्यावर होते. ते जयपूरच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित माजी आमदार संघटनेच्या कार्यक्रमाला संबोधित करत होते. अशोक गेहलोत यांनी केलेल्या भाषणात केलेल्या दाव्याला त्यांनी उत्तर दिले यामध्ये गेहलोत यांनी म्हटले होते की 'उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि लोकसभा अध्यक्ष दोघेही दबावाखाली आहेत.'

धनखड यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला आणि शेवटी दोनदा गेहलोत यांच्या आरोपांना उत्तर दिले. ते सुरुवातीला म्हणाले, 'मी असे म्हणू शकतो की माझ्यावर कोणताही दबाव नाही. मी कोणावरही दबाव आणत नाही आणि मी दबावाखाली येत नाही. मी हे राजस्थानच्या भूमीवर बोलत आहे कारण हे माझ्या जवळच्या मित्राचे विधान आहे. मी स्वतः जवळून पाहिले आहे की माझे मित्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला जी दबावाखाली येऊ शकत नाहीत. मी त्यांच्यासोबत जवळून काम करतो. दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे, राजस्थानचे पाणी पिणारा माणूस कसा दबावाखाली येऊ शकतो. तो कठीण परिस्थितीत कठोर परिश्रम करतो.'

'मी दबावाखाली काम करत नाही'

आपले भाषण संपवण्यापूर्वी, त्यांनी पुन्हा एकदा गेहलोत यांच्या आरोपांना उत्तर दिले आणि म्हणाले, 'शेवटी, मी माझ्या आरोग्याबद्दल नाही तर माझ्या मित्राच्या, माजी मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याबद्दल थोडी चिंताग्रस्त होतो, त्यांनी म्हटले होते की, आम्ही दबावाखाली आहोत. महामहिम, तुम्ही आमची बाजू मांडली आहे. पण मी त्यांना खात्री देऊ इच्छितो की, ते राजस्थानच्या राजकारणातील माझे सर्वात जुने मित्र आहेत, ते माझे सर्वात मोठे हितचिंतक देखील आहेत. आमची कौटुंबिक मैत्री देखील खोल आहे. मी हे जाहीरपणे सांगत आहे कारण त्यांनी हे जाहीरपणे सांगितले आहे. त्यांनी काळजीमुक्त असले पाहिजे, मी दबावाखाली नाही, मी दबाव देत नाही, मी दबावाखाली काम करत नाही. किंवा मी कोणालाही दबावाखाली काम करायला लावत नाही.'

Web Title: I don't work under pressure Why did Jagdeep Dhankhar say this? Video goes viral after resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.