९० तास काम करावे, हे मला मान्य नाही - मल्लिकार्जुन खरगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 05:22 IST2025-01-16T05:22:19+5:302025-01-16T05:22:30+5:30
खरगे म्हणाले की, मी कंपनीचे आभार मानतो, मात्र कंपनीचे सीईओ म्हणाले की, ९० तास काम केले पाहिजे. मला हे मान्य नाही.

९० तास काम करावे, हे मला मान्य नाही - मल्लिकार्जुन खरगे
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी)चे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यम यांच्या ९० तास काम करण्याच्या वक्तव्यावर टीका करत मी त्यांच्याशी सहमत नसल्याचे म्हटले.
खरगे म्हणाले की, मी कंपनीचे आभार मानतो, मात्र कंपनीचे सीईओ म्हणाले की, ९० तास काम केले पाहिजे. मला हे मान्य नाही. कामगार ८ तास काम केले तर थकून जातो. मात्र, हे तर १२ आणि १४ तासांबद्दल बोलत आहेत, अशी टीका त्यांनी केली.