शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

मला आधीच खूप मिळालंय, पंतप्रधानपदाची लालसा नाही- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 1:03 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं.

ठळक मुद्देनितीन गडकरींनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानपदाची लालसा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही. मी माझं काम करतो. मी माझं जीवन माझ्या पद्धतीनं जगतो. मी कोणाच्याही इशाऱ्यांनी बोलत नाही.

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं. परंतु नितीन गडकरींनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानपदाची लालसा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही. मी माझं काम करतो. माझ्या कुवतीपेक्षा मला भरपूर काही मिळालं आहे. मी माझं जीवन माझ्या पद्धतीनं जगतो. मी कोणाच्याही इशाऱ्यांनी बोलत नाही. तसेच यावेळी त्यांनी मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. गंगेचं प्रदूषण कमी झालं असून, गरिबांच्या घराघरात वीज पोहोचल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला आहे.ते म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू हे एक चांगले लेखक होते. मी त्यांची पुस्तकं वाचली आहेत. त्यांची विचारधारा वेगळी आहे. त्यांच्या विकासाचं मॉडल वेगळ होतं. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींचीही स्तुती केली आहे. त्या अनेक पुरुष नेत्यांहूनही सक्षम होत्या, असंही गडकरी म्हणाले आहेत.त्यांच्याकडून भाजपा नेतृत्वावर होत असलेल्या टीकेवरही त्यांनी उत्तर दिलं. माझ्या विधानांची मोडतोड करून ती दाखवली जातात. मी जे बोललोच नाही, ते कोट करून दाखवले जाते. मागील काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते. स्वप्न दाखवणारे नेते जनतेला आवडतात. परंतु ती स्वप्नं पूर्ण न केल्यास जनतेचा मार खावा लागतो. त्यानंतर विरोधकांनी गडकरींनी मोदींना इशारा दिल्याची दवंडी पिटली होती. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी