शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मी काही नामधारी प्रमुख असू शकत नाही; सिद्धू पुन्हा आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 6:18 AM

­पंजाब काँग्रेसमधील मतभेद पुन्हा समोर . निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मला दिले गेले नाही तर मी कोणालाही सोडणार नाही, असेही सिद्धू यांनी जाहीर केले.  गेल्या तीन दिवसांत हरीश रावत यांनी तीन भाष्ये केली.

- व्यंकटेश केसरीलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) आणि पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. “पक्षाची भूमिका आणि घटनेच्या चौकटीत कृती करून निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार राज्यांच्या प्रमुखांना आहेत,” असे पक्षाचे पंजाब प्रभारी हरीश रावत यांनी शुक्रवारी सिद्धू यांना सांगितल्यावर सिद्धू यांनी “निर्णय घेण्याची मुभा नसलेला मी काही नामधारी प्रमुख असू शकत नाही,” असे उत्तर दिले आहे. 

सिद्धू यांचे सल्लागार मलविंदर सिंग माली यांना हरीश रावत यांनी अंतिम इशारा दिल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर वरील परिस्थिती निर्माण झाली आहे. अमृतसरमध्ये आपल्या समर्थकांना मार्गदर्शन करताना सिद्धू यांनी पक्षश्रेष्ठींना बजावले की,  ‘आशा आणि विश्वास’ या माझ्या स्वत:च्या धोरणानुसार काम करण्याची मुभा दिली गेली तर राज्यात पुढील २० वर्षे काँग्रेसची सत्ता राहील, अशी माझी खात्री आहे. परंतु, तुम्ही जर ‘‘मला निर्णय घेऊ देणार नसाल तर मी काहीही मदत करू शकत नाही.” 

निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मला दिले गेले नाही तर मी कोणालाही सोडणार नाही, असेही सिद्धू यांनी जाहीर केले.  गेल्या तीन दिवसांत हरीश रावत यांनी तीन भाष्ये केली. १) मुख्यमंत्री अमरिंदरसिंग हे पंजाब विधानसभा निवडणुकीत नेतृत्व करतील २) सिद्धू यांच्या दोन सल्लागारांनी राजीनामा द्यावा व तो न दिल्यास त्यांना काढून टाकले जाईल आणि ३) प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी पक्षाची भूमिका आणि घटनेच्या चौकटीत वागावे आणि निर्णय घ्यावा. रावत यांच्या या वक्तव्यांनी सिद्धू अस्वस्थ झाले. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी व नेते राहुल गांधी यांच्या पाठिंब्यावर सिद्धू यांनी स्वत:ला राज्याचे आगामी मुख्यमंत्री म्हणून जनतेसमोर आणायला सुरूवात केली होती. दरम्यान, रावत यांचे राज्य उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याचे कारण सांगून ते पंजाब प्रभारीच्या जबाबदारीतून मुक्त होऊ इच्छितात. ही इच्छा त्यांनी सोनिया गांधी यांना कळवली आहे. रावत हे त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री असून, आताही ते त्या पदासाठी इच्छूक आहेत.

कोण निर्णय घेऊ शकते?सिद्धू यांनी जे शब्द वापरले, त्याबद्दल विचारले असता रावत म्हणाले, “प्रसारमाध्यमांतील चर्चांच्या आधारावर मी त्यांना प्रश्न विचारू शकत नाही. त्यांच्या विधानाचा संदर्भ मी पाहीन. ते पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशिवाय कोण निर्णय घेऊ शकते?”

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेस