Modi@4 : जनतेला सलाम; तुमचा विश्वास हीच आमची शक्तीः मोदींचे 'आभार प्रदर्शन'   

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 09:17 AM2018-05-26T09:17:37+5:302018-05-26T09:17:37+5:30

२६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यांच्या सरकारला आज चार वर्षं पूर्ण होत आहेत.

I bow to my fellow citizens for their unwavering faith in our Government: PM Modi | Modi@4 : जनतेला सलाम; तुमचा विश्वास हीच आमची शक्तीः मोदींचे 'आभार प्रदर्शन'   

Modi@4 : जनतेला सलाम; तुमचा विश्वास हीच आमची शक्तीः मोदींचे 'आभार प्रदर्शन'   

Next

नवी दिल्लीः  गेल्या चार वर्षांमध्ये विकास ही  चळवळ झाली आहे. जनतेनं आमच्या सरकारवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांना विनम्र अभिवादन. तुमचा हा विश्वासच आम्हाला बळ देतो, प्रेरणा देतो. त्याच जोरावर आम्ही यापुढेही जनतेच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देऊ, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून व्यक्त केल्या आहेत. 

२६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यांच्या सरकारला आज चार वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मोदींनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्यात. 



'अच्छे दिन' आणि 'सब का साथ सब का विकास' या घोषणांनंतर आता भाजपाने नवा नारा दिला आहे. 'साफ नीयत - सही विकास', असं नवं अभियान त्यांनी सुरू केलंय. त्याचाही एक व्हिडीओ मोदींनी शेअर केला आहे. 


पंतप्रधान मोदी आज ओडिशा दौऱ्यावर असून तिथे जाहीर भाषणात ते आपल्या चार वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडणार आहेत.   

Web Title: I bow to my fellow citizens for their unwavering faith in our Government: PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.