शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतच नाही; निवडणुकांनंतर ठरेल पदाचा दावेदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 7:40 AM

मुलायमसिंह यादव; मैनपुरीतून दाखल केला उमेदवारी अर्ज

मैनपुरी : आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे समाजवादी पक्षाचे (सप) संस्थापक मुलायमसिंह यादव यांनी सोमवारी स्पष्ट केले. मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमेवत पुत्र अखिलेशयादवही होते. सप-बसप युतीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण आहे, या प्रश्नावर मुलायमसिंह म्हणाले की, ते लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर ठरविले जाईल. अखिलेश म्हणाले की, मुलायमसिंह देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील. समाजवादी पक्षाची सारी सूत्रे दोन वर्षांपूर्वी अखिलेश यादव यांच्या हाती गेल्यानंतर पिता-पुत्रांचे संबंध आणखी बिघडले आणि २०१७च्या विधानसभा निवडणुकांचा मुलायमसिंह यांनी सपचा प्रचार केला नव्हता. त्यांनी अखिलेशविरोधात वेळोवेळी टीकाही केली होती. लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात अखिलेश दिरंगाई करत असल्याचा आरोपही मुलायमसिंह यांनी गेल्या महिन्यात केला होता. सपने बसपशी केलेल्या युतीबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

मैनपुरीमधून मुलायमसिंह यांच्या विरोधात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय त्यांचे भाऊ शिवपाल यादव यांच्या प्रगतिशील समाजवादी पार्टी व काँग्रेसने घेतला आहे. या मतदारसंघातील भाजप उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. आदराने मुख्यमंत्रीच म्हणतात!मैनपुरीमधून मुलायमसिंह १९९६, २००४, २००९, २०१४ मध्ये निवडणुकांत प्रचंड मताधिक्याने विजयी झाले होते. सपने पोटनिवडणुकीसह ही जागा १९९६ पासून आठ वेळा जिंकली आहे.भाजपला इथे एकदाही विजय मिळालेला नाही. तिसऱ्या टप्प्यात२८ मार्च रोजी या मतदारसंघात मतदान होणार आहे. या मतदारसंघात ग्रामीण मतदार अधिक असून यादवांची संख्या ३५% आहे.उत्तर प्रदेशचे तीनदा मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या मुलायमसिंह यांना येथे अनेक जण आजही आदराने ‘मुख्यमंत्री’ म्हणतात.मुलायमसिंह यांचे मताधिक्य वाढेल?मुलायमसिंहना २००९मध्ये ३,९२,३०८मते (५६.४४ टक्के) मिळाली होती, तर २०१४ साली मोदी लाट असूनही मुलायमसिंह ५,९५,९१८ मते (६० टक्के) मिळवून विजय झाले होता. आता सप व बसप युती असल्याने मुलायमसिंह यांच्या मताधिक्यात आणखी वाढ होईल, असे म्हटले जाते.

टॅग्स :Mulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवprime ministerपंतप्रधान