शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

"रडत राहणं काहींचा स्वभाव, माझा न रडण्यावर, ना रडवण्यावर विश्वास"; मोदींचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 17:34 IST

Viral Video : गुजरातमधील सूरत या ठिकाणी पंतप्रधान मोदी भाषण करतानाचा हा व्हिडीओ आहे. २०१९ मधील भाषणाचा हा व्हि़डीओ झाला व्हायरल. काही दिवसांपूर्वी एका बैठकीदरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले होते भावूक.

ठळक मुद्देगुजरातमधील सूरत या ठिकाणी पंतप्रधान मोदी भाषण करतानाचा हा व्हिडीओ आहे. काही दिवसांपूर्वी एका बैठकीदरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले होते भावूक.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या काही राज्यांतील जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधला होता. त्यासोबतच, डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ आणि फ्रंटलाईन वर्कर्संसोबतही चर्चा केली. त्यांनी वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्संशी संवाद साधला. त्यावेळी, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल बोलताना मोदींचा कंठ दाटून आला होता. दरम्यान, यानंतर आता मोदींच्या भाषणाचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्यानं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींच्या गुजरातमधील एका भाषणाचा काही भाग शेअर केला आहे. गुजरातमधील सूरत या ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या २०१९ मध्ये झालेल्या भाषणाचा काही भाग व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे "रडत राहणं काहींचा स्वभाव असतो. माझा न रडण्यावर विश्वास आहे, ना रडवण्यावर विश्वास," असं म्हणताना दिसत आहेत.   काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरूण यादव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. "रडत राहणं काहींचा स्वभाव असतो. माझा न रडण्यावर विश्वास आहे, ना रडवण्यावर विश्वास आहे असं नरेंद्र मोदी म्हणत आहेत. मग त्यांनी मगरीचे अश्रू का काढले. देशाच्या जनतेला याचं उत्तर हवं आहे," असं ते म्हणाले. यापूर्वी महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीदेखील मोदींवर यावरून टीका केली होती. तसंच तो ठरवून करण्यात आलेला कार्यक्रम असल्याचा आरोपही केला होता.

चर्चेदरम्यान काय म्हणाले होते मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधील डॉक्टरांशी बोलताना प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरून कौतुक केलं. तसेच, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कामाचंही कौतुक केलं. मात्र, कोविडच्या लढाईत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचा उल्लेख करताना मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालंय. कोरोनाच्या लढाईत आपण अनेक आप्तेष्ठांना गमावलंय. मी काशीचा एक सेवक असून काशीतील प्रत्येकाचे आभार मानतो. विशेषत: डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य सेवकांनी जे काम केलंय, ते कौतुकास्पद आहे. या महामारीने आपल्या जवळील माणसं नेली आहेत. त्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असंही मोदी म्हणाले होते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याTwitterट्विटरcongressकाँग्रेसIndiaभारत