डीएमकेचा मीच पक्षप्रमुख - एम.के. स्टॅलिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 04:08 IST2018-08-16T04:08:16+5:302018-08-16T04:08:24+5:30

अण्णा द्रमुकचे अध्यक्ष आणि माझे पिता एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर आपणच पक्षाचे अध्यक्ष असल्याचे हंगामी अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी पक्षनेत्यांना एक निवेदन पाठवून जाहीर केले.

I am the chief of DMK - M.K. Stalin | डीएमकेचा मीच पक्षप्रमुख - एम.के. स्टॅलिन

डीएमकेचा मीच पक्षप्रमुख - एम.के. स्टॅलिन

चेन्नई  - अण्णा द्रमुकचे अध्यक्ष आणि माझे पिता एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर आपणच पक्षाचे अध्यक्ष असल्याचे हंगामी अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी पक्षनेत्यांना एक निवेदन पाठवून जाहीर केले. पक्षनेत्यांना पाठवलेल्या पत्रात स्टॅलिन म्हणतात, आपच्या पक्षाचे नेते आपल्याला सोडून गेले आणि पक्षनेते माझी बाजू घेतील या खात्रीने मी पक्षाची सूत्रे हाती घेतली आहेत. पक्षाने बैठक घेऊन करुणानिधी यांना श्रद्धांजली वाहणारा ठराव मंजूर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पत्र पाठविण्यात आले. या बैठकीत पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष होण्यासाठी स्टॅलिन यांना विनंती केली होती. स्टॅलिन यांचे हे निवेदन म्हणजे त्यांचे बंधू आणि पक्षातून काढण्यात आलेले नेते अलागिरी यांना उत्तर असल्याचे म्हटले जाते. (वृत्तसंस्था)

Web Title: I am the chief of DMK - M.K. Stalin