Hyderabad Encounter : 'देशासमोर उत्तम उदाहरण राहिल, माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 09:50 AM2019-12-06T09:50:07+5:302019-12-06T09:51:21+5:30

Hyderabad Case : हैदराबादच्या दिशा प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर म्हणजे देशाला एक संदेश देण्यात आल्याचं

Hyderabad Rape and Murder case - 'My daughter's soul was at peace', said girl's father of hyederabad rape and murder case | Hyderabad Encounter : 'देशासमोर उत्तम उदाहरण राहिल, माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली'

Hyderabad Encounter : 'देशासमोर उत्तम उदाहरण राहिल, माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली'

googlenewsNext

हैदराबाद - देशाला हदरवून टाकणारं हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी खात्मा केला आहे. ज्या ठिकाणी आरोपींनी पीडित तरुणीवर बलात्कार केला होता. त्याचठिकाणी पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. पोलीस तपासावेळी हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी ही घटना घडली. या घटनेत चारही आरोपींचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भावना व्यक्त करताना, पोलिसांचं कौतुक करत न्याय मिळाल्याचं म्हटलं आहे. 

हैदराबादच्या दिशा प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर म्हणजे देशासमोर एक उदाहरण ठेवण्यात आल्याचं पीडितेच्या बहिणीने म्हटले आहे. तर, माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली, असे पीडितेच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील निर्भयाचे वडिल बद्रीनाथ सिंग यांनीही पोलिसांच्या धाडसी कारवाईला आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, मी आणि माझ्या पत्नीप्रमाणे होणाऱ्या अग्निपरीक्षेतून दिशाच्या आई-वडिलांची सुटका झाली, असेही  सिंग यांनी म्हटले आहे. दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडिया आणि नागरिकांमधून पोलिसांची पाठराखण करत कारवाईचं कौतुक होत आहे. तेलंगणा पोलिसांकडून या 4 आरोपींना घटनास्थळावर तपासासाठी नेलं होतं. त्यावेळी घटनेचा रिक्रिएशन समजून घेताना त्यातील आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे अखेर पोलिसांनी गोळीबार करत या आरोपींचा एन्काऊंटर केला आहे. सायबराबादचे पोलीस आयुक्त वी.सी.सज्जनार यांच्या नेतृत्वात पोलिसांनी ही कारवाई केली.

हैदराबाद बलात्कार प्रकरणाचे संपूर्ण पडसाद देशभरात उमटले होते. संसदेतही महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. मात्र पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये ४ आरोपींचा खात्मा झाला आहे. मात्र आता या घटनेनंतर पोलिसांच्या चौकशीचा मुद्दा समोर येणार का? मानवाधिकार कार्यकर्त्यांकडून संबंधित घटनेवर काय भाष्य होणार हे पाहणे गरजेचे आहे. परंतु संपूर्ण देशभरात या बलात्कार प्रकरणातील आरोपींबाबत संतापाची लाट होती. लोकांचा रोष, आक्रोश या आरोपींबद्दल होता. एखाद्या पीडितेसोबत बलात्कार करुन क्रूररित्या तिला जाळून टाकलं जातं. त्यामुळे लोकांकडून पोलिसांच्या कृत्याचं कौतुक केले जात आहे. पीडित शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशु चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली होती. दरम्यान, पीडितीची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. तिने तिची स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना पीडित स्कूटरजवळ आली तेव्हा बुधवारी सायंकाळी तिने बहिणीला कॉल करून स्कुटर रिपेअर करण्याबाबत माहिती दिली. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितले,तेव्हा पीडितीने काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत असं सांगितलं. थोड्यावेळाने कॉल करते असं सांगून पीडितीने फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. तिचं बहिणीशी रात्री ९. १५ वाजताच्यादरम्यान शेवटचं बोलणं झालं होतं.

दरम्यान, स्कूटरजवळ उभी असताना तिने तिच्या बहिणीला फोन केला होता. मी जिथे उभी आहे तिथे मला भीती वाटते आहे असं तिने बहिणीला सांगितलं होतं. या संभाषणानंतर तिचा फोन बंद झाला. शेवटी पीडितीच्या कुटुंबीयांनी शम्शाबाद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळची ६ वाजता दुधवाल्याला जळालेला मृतदेह आढळून आला होता. 
 

Web Title: Hyderabad Rape and Murder case - 'My daughter's soul was at peace', said girl's father of hyederabad rape and murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.