शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

Hyderabad Rape and Murder case 'दिल्ली अन् युपी पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 10:46 AM

उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

हैदराबाद - तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये 27 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी मध्यरात्री एन्काऊंटर केला आहे. त्यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. तर सोशल मीडियावर हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलं जातंय. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनीही हैदराबाद पोलिसांकडून इतरांनी प्रेरणा घ्यावी, असे म्हटलंय.

उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पण, येथील राज्य सरकार झोपलंय. उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबादच्या पोलिसांची प्रेरणा घ्यायला हवी, असे मत बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी व्यक्त केले आहे. हैदराबादमधील दिशा बलात्कार आणि खून प्रकरणातील चारही आरोपींचा तेलंगणा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. त्यानंतर, देशभर या घटनेची चर्चा सुरू असून सर्वजण प्रतिक्रिया देत आहेत. मायावती यांनीही पोलिसांच्या या कृत्याचे समर्थन केले आहे. तसेच, उत्तर प्रदेश पोलिसांनी धडा घ्यावा. पण येथील गुन्हेगारांना पाहुण्यांप्रमाणे वागणूक दिली जातेय. येथे उत्तर प्रदेशात जंगलराज असल्याचंही मायावती यांनी म्हटलंय. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासावेळी आरोपींना पोलीस घटनास्थळी घेऊन गेले होते. त्यावेळी पोलिसांच्या तावडीतून आरोपींनी निसटण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही ते पळून जात होते. अखेर पोलिसांनी गोळीबारी केली. त्यात या चारही आरोपींचा मृत्यू झाला आहे.

हैदराबाद बलात्कार पीडितेचे जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला होता. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली होती. पीडितीच्या हत्याप्रकरणी पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक खुलासा समोर आला होता. प्राथमिक माहितीनुसार 4 जणांनी पीडितीवर सामूहिक बलात्कार केला, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितीला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितीवर अत्याचार करण्यात आले. दरम्यान, स्कूटरजवळ उभी असताना दिशाने तिच्या बहिणीला फोन केला होता. मी जिथे उभी आहे तिथे मला भीती वाटते आहे असं तिने बहिणीला सांगितलं होतं. या संभाषणानंतर तिचा फोन बंद झाला. शेवटी पीडितीच्या कुटुंबीयांनी शम्शाबाद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळची 6 वाजता दुधवाल्याला जळालेला मृतदेह आढळून आला होता. 

टॅग्स :mayawatiमायावतीhyderabad-pcहैदराबादRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी