Hyderabad Suicide News: लग्न न होण्याच्या मानसिक तणावातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना तेलंगानाची राजधानी हैदराबादमधून समोर आली आहे. अत्तापूर परिसरात राहणारा ३० वर्षीय प्रविण दीर्घकाळ लग्न न ठरल्यामुळे नैराश्यात होता. वय वाढत चालल्याने आणि वारंवार संबंध जुळूनही लग्न ठरत नसल्याने तो स्वतःला एकाकी व असहाय्य समजू लागला होता.
सामाजिक दबावामुळे वाढला तणाव
कुटुंबीय आणि नातेवाईक वारंवार “तुझे लग्न कधी होणार?” असे प्रश्न विचारायचे अन् टोमणाही मारायचे. यामुळे प्रविणवरील मानसिक दबाव अधिक वाढला होता. मागील काही दिवसांपासून तो अत्यंत अस्वस्थ असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या तीव्र मानसिक तणावातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
२० मजली इमारतीवरून उडी मारली
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी प्रविण एका २० मजली इमारतीवर गेला आणि तेथून उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : A 30-year-old man in Hyderabad committed suicide due to the stress of not getting married. Facing constant pressure and taunts from relatives about his marriage, he jumped from a 20-story building. Police are investigating the case.
Web Summary : हैदराबाद में 30 वर्षीय युवक ने शादी न होने के तनाव में आत्महत्या कर ली। रिश्तेदारों के लगातार ताने और दबाव के कारण उसने 20 मंजिला इमारत से कूदकर जान दे दी। पुलिस मामले की जांच कर रही है।