नव-याने पत्नीच्या प्रियकराला नग्न करुन झाडाला बांधले, मारहाणीत प्रियकराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 16:54 IST2017-11-24T16:21:28+5:302017-11-24T16:54:01+5:30
विवाहित महिलेबरोबर प्रेमसंबंध ठेवणा-या तिच्या प्रियकराला नग्न करुन झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली.
_201707279.jpg)
नव-याने पत्नीच्या प्रियकराला नग्न करुन झाडाला बांधले, मारहाणीत प्रियकराचा मृत्यू
बंगळुरु - नव-याने पत्नीच्या प्रियकराला नग्न करुन झाडाला बांधून बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रियकराचा मृत्यू झाला. कर्नाटकाच्या यादगिरी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली.
प्रियकराबरोबर या महिलेलाही झाडाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार निर्मला असे या महिलेचे नाव आहे. महिलेच्या पतीनेच मित्रांच्या मदतीने प्रियकराला आणि तिला झाडाला बांधून मारहाण केली. अनैतिक संबंधातून ही हत्या झाली. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्व आरोपी फरार झाले आहेत. (सविस्तर वृत्त लवकरच)