शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पतीने तीन थप्पड लगावल्या, भाजप आमदाराने छळ केल्याचा पत्नीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 13:21 IST

विवाहानंतर दोन महिन्यांनी केला व्हिडीओ जारी; चौथ्याच दिवशी काढले बाहेर

ठळक मुद्देएचपीएएसच्या २०२०च्या बॅचच्या अधिकारी ओशिन शर्मा यांचा ११ मिनिटांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, भाजप आमदार पतीने मागील गुरुवारी आपल्याला तीन थप्पड लगावल्या.

सिमला : हिमाचल प्रदेशातील धर्मशालाचे भाजप आमदार विशाल नेहरिया यांनी आपला शारीरिक, मानसिक छळ केल्याची तक्रार त्यांच्याच पत्नीने केल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्या पत्नी हिमाचल प्रदेश प्रशासनिक सेवेत (एचपीएएस) अधिकारी आहेत.

एचपीएएसच्या २०२०च्या बॅचच्या अधिकारी ओशिन शर्मा यांचा ११ मिनिटांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, भाजप आमदार पतीने मागील गुरुवारी आपल्याला तीन थप्पड लगावल्या. कांगडा जिल्हा ग्रामीण विकास एजन्सीच्या (डीआरडीए) नगरोट सूरियानमधील विभागीय विकास अधिकारी म्हणून शर्मा कार्यरत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, नेहरिया यांनी त्यांना अनेकदा शारीरिक व मानसिकरीत्या छळले आहे.नेहरिया व शर्मा यांचा विवाह अवघ्या दोन महिन्यांपूर्वी २६ एप्रिल रोजी झालेला आहे. त्या आता त्यांच्या माहेरी परतलेल्या आहेत. या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये नेहरिया यांनी चंडीगडच्या एका हॉटेलमध्ये त्यांना मारहाण केली होती.  ३२ वर्षीय नेहरिया २४ ऑक्टोबर, २०१९ रोजी पोटनिवडणुकीत धर्मशालाचे आमदार झाले आहेत. त्यांच्या पत्नीने म्हटले आहे की, मी कोरोना संक्रमित झाल्यामुळे विवाहानंतर चौथ्याच दिवशी पतीने बाहेर काढले. त्यानंतर, त्यांनी स्वत:ला जखम करून घेण्याची धमकीही दिली होती.

‘सासरकडील लोकांनी हुंड्यासाठीही छळ केला’ओशिन शर्मा या धर्मशालाचे भाजप आमदार विशाल नेहरिया यांना महाविद्यालयीन शिक्षणापासून ओळखत आहेत. त्यावेळीही नेहरिया त्यांना मारहाण करीत असल्यामुळे दोघांमधील संबंध संपुष्टात आले होते. नेहरिया यांनी आमदार झाल्यानंतर २०१९ मध्ये शर्मा यांच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर, दोघांचा विवाह झाला. आपल्या सासरकडील लोक हुंडा मागत आहेत, असा आरोपही शर्मा यांनी केला. 

टॅग्स :MLAआमदारBJPभाजपाmarriageलग्नPoliceपोलिस