उत्तर प्रदेशमधील अलिगड येथील लोधा परिसरात झालेल्या इलेक्ट्रिकशियनच्या हत्येप्रकरणी पोलीस तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांना मृताच्या पत्नीसह तीन आरोपींना अटक केली आहे. तर दोन इतर आरोपी फरार आहेत. प्रेमप्रकरणामधून पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासामधून समोर आली आहे.
पतीची हत्या केल्यानंतर आरोपींनी अपघातामुळे मृत्यू झाल्याचे भसवण्यासाठी मृतदेह गाडीत ठेवून एका रस्त्यावर फेकून दिला. या हत्याकांडाबाबत माहिती देताना एसपी मृगांक शेखर पाठक यांनी सांगितले की, मृत व्यक्तीची पत्नी, तिचा प्रियकर आणि मित्रांनी घडवून आणली. १७ डिसेंबर रोजी लोधा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकरावत गाावामधील हैबतपूर मार्गावर एक अज्ञात मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला होता. तसेच गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली.
या प्रकरण पोलिसांनी सखोल तपासास सुरुवात करून कॉल डिटेल तपासली तेव्हा हत्या झाली त्या दिवशी मृताच्या पत्नीने फोनवरून सात वेळा संभाषण केल्याचं समोर आलं. त्याआधारावर पोलिसांनी संबंधित एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. जेव्हा पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा संपूर्ण कटकारस्थान उघडकीस आलं.
मृत राजकुमार याची पत्नी ज्योती शर्मा हिचे बॉबी कुमार याच्यासोबत अनैतिक संबंध होते, अशी माहिती पोलीस तपासामधून समोर आली. तसेच या अनैतिक संबंधांबाबत राजकुमार याला कुणकुण लागल्यावर दोघांमध्ये वाद वाढल्याचेही तपासातून उघड झाले. त्यामुळेच बॉबी कुमार याने त्याच्या संदीप, हरीश, सनी या सहकाऱ्यांच्या मदतीने ज्योती शर्मा हिच्यासोबत मिळून राजकुमार याची हत्या केल्याचे तपासातून समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी बॉबी, संदीप आणि ज्योती कुमार यांना अटक केली आहे. तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
Web Summary : In Uttar Pradesh, a woman, her lover, and an accomplice were arrested for murdering her husband. They tried to stage a road accident to cover their crime, but police found inconsistencies in their statements and phone records, revealing the affair and murder plot.
Web Summary : उत्तर प्रदेश में पत्नी, प्रेमी और एक साथी गिरफ्तार। इन्होंने पति की हत्या कर दुर्घटना का रूप देने की कोशिश की। पुलिस ने बयानों और फोन रिकॉर्ड में विसंगतियां पाईं, जिससे प्रेम संबंध और हत्या का षडयंत्र उजागर हुआ।