Triple Talaq: हुंड्यात कार दिली नाही म्हणून WhatsApp वर दिला 'तलाक', मग पत्नीने जे केलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 07:54 PM2022-11-03T19:54:02+5:302022-11-03T19:54:42+5:30

पत्नीला मध्यरात्री पतीने थेट WhatsApp वर मेसेज केला

Husband gives triple talaq on WhatsApp to wife after car not gifted in dowry then what happened next read details | Triple Talaq: हुंड्यात कार दिली नाही म्हणून WhatsApp वर दिला 'तलाक', मग पत्नीने जे केलं...

Triple Talaq: हुंड्यात कार दिली नाही म्हणून WhatsApp वर दिला 'तलाक', मग पत्नीने जे केलं...

googlenewsNext

Triple Talaq: उत्तर प्रदेशातील बरेली येथून तिहेरी तलाकचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात आरोपी पतीने रात्री १२ वाजता WhatsApp वर तिहेरी तलाकचा मेसेज पाठवून पत्नीसोबतचे नाते तोडले. तिहेरी तलाक पीडितेच्या तक्रारीवरून SSPच्या आदेशानुसार किल्ला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पीडितेने तिच्या तक्रारीत सांगितले की, तिने तिच्या कुटुंबीयांचा नकार पत्करून ठाणे फोर्ट परिसरातील सिकंदर नावाच्या तरुणासोबत प्रेमविवाह केला. नंतर कुटुंबीयांनी मुस्लीम रितीरिवाजानुसार, अलिशाचा सिकंदरसोबत विवाह केला.

पीडितेने सांगितले की, लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चालले होते. मात्र काही दिवसांनंतर आरोपीने तिचा हुंड्यासाठी सतत छळ सुरू केला. पीडित महिला बारादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगतपूर गोटिया येथील रहिवासी आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या वेळी तिच्या कुटुंबीयांनी ५ लाख रुपये खर्च केले होते. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्यांनी तिचा हुंड्यासाठी छळ सुरू केला. आणि हुंड्यात कार आणि दोन लाख रुपये मागायला लागल्यावर तिने नकार दिल्याने तिचा नवरा तिला रोज मारहाण करायचा.

WhatsApp वर दिला तिहेरी तलाक

पतीमुळे त्रस्त असलेली पीडिता काही काळापूर्वी तिच्या माहेरी आली होती. त्यानंतर बुधवारी रात्री १२ वाजता तिच्या मोबाईलवर WhatsApp वर एक मेसेज आला. मेसेजमध्ये 'मी तुला घटस्फोट देतो' असे ३ वेळा लिहिले होते आणि त्याने नाते संपवले. त्यानंतर पीडितेने या प्रकरणाची तक्रार SSPकडे आणि  राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.

आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

SSPच्या आदेशावरून पती आणि सासरच्या लोकांच्या विरोधात फोर्ट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणी एसपी ग्रामीण राजकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, एक महिला माझ्याकडे आली होती. तिने सांगितले की, तिच्या पतीने WhatsApp वर मेसेज पाठवून ३ तलाक दिला आहे. या प्रकरणी किल्ला पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Husband gives triple talaq on WhatsApp to wife after car not gifted in dowry then what happened next read details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.