शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सकाळी उशिरा उठली म्हणून पत्नीला दिला तलाक, उत्तर प्रदेशातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 11:17 AM

सकाळी उशिरा उठली म्हणून एका व्यक्तीने पत्नीला मारहाण करून तिला तलाक दिला आहे.

ठळक मुद्देएकीकडे केंद्र सरकारकडून ट्रिपल तलाकची प्रथा कायमची बंद करण्यासाठी कठोर विधेयक आणण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे ट्रिपल तलाकच्या घटना अजूनही घडताना दिसत आहेत.उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये ट्रिपल तलाक दिल्याची नवी घटना समोर आली आहे. सकाळी उशिरा उठली म्हणून एका व्यक्तीने पत्नीला मारहाण करून तिला तलाक दिला आहे.

रामपूर- ट्रिपल तलाकची प्रथा कायमची बंद करण्यासाठी संसदेत गुरूवारी विधेयक मांडलं जाणार आहे. एकीकडे केंद्र सरकारकडून ट्रिपल तलाकची प्रथा कायमची बंद करण्यासाठी कठोर विधेयक आणण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे ट्रिपल तलाकच्या घटना अजूनही घडताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये ट्रिपल तलाक दिल्याची नवी घटना समोर आली आहे. सकाळी उशिरा उठली म्हणून एका व्यक्तीने पत्नीला मारहाण करून तिला तलाक दिला आहे. इतकंच नाही, तर पत्नीला घराबाहेर काढून घराला कुलूप लावून तो व्यक्ती निघून गेला. अजीमनगर क्षेत्रातील नगलिया आकिल गावात ही घटना घडली आहे.  

गुलअफशा असं या प्रकरणातील पीडित महिलेचं नाव आहे. 'सकाळी उशिरा उठली इतकाच माझा गुन्हा झाला. त्यावरून पतीने मला बेदम मारहाण केली आणि तलाक दिला', असं गुलअफशा यांनी सांगितलं. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलीस पीडित महिलेला घेऊन तिच्या घरी गेले व दरवाज्याचं कुलूप तोडून घरात गेले.

गुलअफशाचं सहा महिन्यापूर्वी गावातील कासिमशी प्रेमविवाह झाला होता. पण लग्नानंतर काही दिवसात दोघांमध्ये खटके उडायला लागले. कासिम विनाकारण गुलअफशाला मारहाण करायला लागला. सोमवारी सकाळी दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर कासिमने गुरअफशाला मारहाण केली. शेजाऱ्यांनी मध्यस्ती करत दोघांमधील वाद शांत केला. मारहाण झाल्याने गुलअफशाला सोमवारी रात्रभर झोप लागली नाही म्हणून मंगळवारी सकाळी तिला उठायला उशिर झाला. त्यामुळे संतापलेल्या कासिमने तिला मारहाण करून ट्रिपल तलाक दिला तसंच घरातून हाकलून दिलं. 

कासिमशी प्रेमविवाह केल्याने नाराज झालेल्या गुलअफशाच्या आई-वडिलांनी तिच्याशी संबंध तोडले होते. पण ज्या व्यक्तीसाठी गुलअफशाने घर व आई-वडिलांना सोडलं त्याचं व्यक्तीने तिला घराबाहेर काढलं आहे.  

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकUttar Pradeshउत्तर प्रदेश