पत्नी जवळ घेत नाही, मला घटस्फोट हवाय, पतीची कोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 11:18 IST2018-06-25T11:12:54+5:302018-06-25T11:18:12+5:30
व्हॉट्सअॅपवर दुस-या लोकांशी पत्नी चॅटिंग करत असल्याचा आरोप करत एका व्यक्तीने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली आहे. या व्यक्तीने व्हॉट्सअॅप चॅटिंगचा आधार घेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्नी जवळ घेत नाही, मला घटस्फोट हवाय, पतीची कोर्टात धाव
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपवर दुस-या लोकांशी पत्नी चॅटिंग करत असल्याचा आरोप करत एका व्यक्तीने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली आहे. या व्यक्तीने व्हॉट्सअॅप चॅटिंगचा आधार घेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांच्या लग्नाला अद्याप एक वर्ष सुद्धा पुर्ण झाले नाही. दरम्यान, या व्यक्तीने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश ए. के. सरपाल यांनी त्याच्या पत्नीला नोटीस पाठविली. यानंतर कोर्टात पत्नीने सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगितले आहे. मात्र, कोर्टाने सध्या दोघांना एकत्र आणण्यासाठी काउंसिलिंग सेलमध्ये पाठविले आहे.
घटस्फोटासाठी याचिका दाखल करणा-या संशयित व्यक्तीने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांवर आरोप केले आहे. त्याने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, गेल्यावर्षी मे महिन्यात दोघांचे लग्न झाले होते. लग्नानंतर पती- पत्नीमधील संबंध चांगले नव्हते. पत्नी माझ्यापासून लांब राहायची. माझा पगारही ती स्वतःकडेच ठेवून घ्यायची. कुटुंबातील बाकीच्या लोकांवर खर्च करायला देत नाही.
याशिवाय, या व्यक्तीने आपली पत्नी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देते आणि रात्रभर व्हॉट्सअॅपवर दुस-यांशी चॅटिंग करत असते, असा आरोप याचिकेत केला आहे. एक दिवस पत्नीचा मोबाईल घेऊन व्हॉट्सअॅपरील सर्व मेसेज वाचले. त्यावेळी समजले की, काही तरुणांशी अश्लील मेसेज करते. तसेच, अश्लील फोटो व्हिडीओ शेअर करत असते, असे म्हटले आहे. दरम्यान, या आरोपांशी संबंधित एक हार्ड डिक्स सुद्धा या व्यक्तीने कोर्टाकडे सोपविली आहे.