हॉटेलमध्ये पतीला प्रेयसी-सोबत रंगेहाथ पकडले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 07:33 IST2022-09-22T07:32:55+5:302022-09-22T07:33:15+5:30

देवरी रोड येथे राहणारा दिनेश एका रुग्णालयात काम करतो.

Husband caught red-handed with girlfriend in hotel and… | हॉटेलमध्ये पतीला प्रेयसी-सोबत रंगेहाथ पकडले अन्...

हॉटेलमध्ये पतीला प्रेयसी-सोबत रंगेहाथ पकडले अन्...

आग्र्याच्या एका हॉटेलमध्ये ‘पती, पत्नी और वो’चा हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. हॉटेलमध्ये प्रेयसीसोबत असलेल्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडले. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. मग काय, आधी पत्नीने पतीला चप्पलने मारहाण केली. पती हात जोडून माफी मागायला लागला. नंतर मैत्रिणीलाही केस पकडून ओढले आणि बेदम मारले. माहितीनुसार, प्रकरण दिल्ली गेट परिसरातील आहे.

देवरी रोड येथे राहणारा दिनेश एका रुग्णालयात काम करतो. निलम आणि त्याच्या लग्नाला १६ वर्षांहून अधिक काळ लोटला असून दोघांना दोन मुलेही आहेत; पण पतीच्या लफडेबाज स्वभावामुळे दोघांच्यात दुरावा निर्माण झाला होता. महिलेकडे पतीच्या कृत्याबद्दल सतत तक्रारी येत होत्या.

Web Title: Husband caught red-handed with girlfriend in hotel and…

टॅग्स :Womenमहिला