शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

पत्नीनं प्रियकराला भेटायला बोलावलं; पतीनं दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं अन् जागीच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 20:05 IST

उत्तर प्रदेशातील हरदोई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

हरदोईउत्तर प्रदेशातील हरदोई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे आपल्या विवाहित प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या मृत्यूच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. दोघांना एकत्र पाहून महिलेच्या पतीने प्रियकराला बेदम मारहाण करून घराबाहेरील खांबाला बांधून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी संबंधित प्रियकराला रूग्णालयात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाला.

माहिती मिळताच हरदोईच्या एसपींनी देखील घटनास्थळाची पाहणी केली. विषारी द्रव्य प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सध्या पोलीस घटनेची अधिक चौकशी करत आहेत. खरं तर फरुखाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या पंकजचे रेती पोलीस स्टेशन परिसरातील आदमपूर येथील रहिवासी प्रतिपाल यांची पत्नी प्रीती हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. हिमाचल प्रदेशातील एका खासगी कारखान्यात काम करत असताना त्यांचे प्रेमप्रकरण सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. 

पत्नीला प्रियकरासोबत पाहताच पती संतापला प्रीतीचा पती प्रतिपाल याला याची माहिती मिळताच तो पत्नीसह आदमपूर या त्याच्या मूळ गावी आला होता. यानंतरही  त्याची पत्नी आणि प्रियकरामध्ये बोलणे सुरूच राहिले आणि त्यांचे प्रेम वाढतच गेले. मग विवाहित प्रेयसी प्रितीने तिचा प्रियकर पंकजला भेटण्यासाठी घरी बोलावले असता प्रतिपालने त्यांना आक्षेपार्ह स्थितीत रंगेहात पकडले. संतापलेल्या प्रतिपालने पत्नीसह तिच्या प्रियकराला बेदम मारहाण केली. याशिवाय पतीने पत्नीच्या प्रियकराला घराबाहेर असलेल्या खांबाला बांधून ठेवले. 

प्रियकराचा संशयास्पद मृत्यू स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रियकर पंकजला रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या एसपींनी घटनास्थळाची कसून पाहणी केली आहे. एसपी राजेश द्विवेदी यांनी सांगितले की, घरात विषारी पदार्थ सापडला आहे. त्यामुळे विषारी द्रव्य पिऊन मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मात्र, अद्याप मृताच्या नातेवाईकांनी तक्रार दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यू