"मी सनातन धर्माचा…"; गीता पठणासंदर्भात हुमायूं कबीर यांचं वक्तव्य, केली मोठी घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 14:22 IST2025-12-11T14:21:23+5:302025-12-11T14:22:56+5:30
कबीर पुढे म्हणाले, "पठणाच्या दोन दिवसांनंतर, बाबरी मशिदीचे काम धूमधडाक्यात सुरू करण्यात येईल. ज्या ठिकाणी बाबरी मशीत तयार होईल, त्याच ठिकाणी...

"मी सनातन धर्माचा…"; गीता पठणासंदर्भात हुमायूं कबीर यांचं वक्तव्य, केली मोठी घोषणा!
पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी केल्यानंतर, आता आमदार हुमायूं कबीर कुरान पाठनाच्या भव्य आयोजनाची तयारी करत आहेत. ते बुधवारी म्हणाले, मी सनातन धर्माचा आदर करतो. रविवारी कोलकात्यात मोठ्या प्रमाणावर गीती पठणाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय, त्यांनी 22 डिसेंबरला नव्या राजकीय पक्षाच्या घोषणेचीही तयारी केली आहे.
एएनआयसोबत बोलताना, गीता पठणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर कबीर म्हणाले, “सनातन धर्माच्या लोकांनी गीता पाठ केले. मी त्यांचा आदर करतो, त्यांच्याप्रति माझ्या मनात नितांत श्रद्धा आहे. मीही एक लाख लोकांसह कुरान पाठ करणार आहे. यात, बंगालातील 90 हजार आणि देशातील इतर राज्यांतून आलेले 10 हजार, अशा एकूण एक लाख लोकांचा समावेश असेल.”
कबीर पुढे म्हणाले, "पठणाच्या दोन दिवसांनंतर, बाबरी मशिदीचे काम धूमधडाक्यात सुरू करण्यात येईल. ज्या ठिकाणी बाबरी मशीत तयार होईल, त्याच ठिकाणी मंडप टाकून, शामियाना उभारून पठण केले जाईल. तत्पूर्वी रविवारीही त्यांनी, आपण फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर ‘कुरान ख्वानी’चे आयोजन करणार आहोत, असे म्हटले होते.
भव्य गीता पठणाचे आयोजन -
तत्पूर्वी, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राउंडवर रविवारी भगवद गीतेचे सामूहिक पाठण करण्यात आले. यात साधू-साध्वींसह मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे एक लाख लोकांनी गीतेच्या पहिल्या, नवव्या आणि अठराव्या अध्यायाचे पठण केले. केंद्रीय मंत्री सुकांत मजूमदार, शुभेंदु अधिकारी, माजी खासदार लॉकेट चटर्जी तथा आमदार अग्निमित्रा पॉल आदी नेते उपस्थित होते.
याशिवाय, कार्तिक महाराज नावाने ओळखले जाणारे, स्वामी प्रदीप्तानंद महाराज तथा बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्रीसारखे काही प्रमुख धार्मिक नेतेही यावेळी उपस्थित होते.