खाकीतली माणुसकी! असाह्य कळा सोसणाऱ्या गरोदर महिलेची पोलिसांनी गाडीत केली प्रसूती  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 10:41 PM2020-04-10T22:41:05+5:302020-04-10T22:43:09+5:30

जन्मलेल्या मुलाचे वडील खूप आनंदित झाले आहेत. 

Humanity in khaki! woman gave birth to child in police gypsy at delhi kotla mubarakpur pda | खाकीतली माणुसकी! असाह्य कळा सोसणाऱ्या गरोदर महिलेची पोलिसांनी गाडीत केली प्रसूती  

खाकीतली माणुसकी! असाह्य कळा सोसणाऱ्या गरोदर महिलेची पोलिसांनी गाडीत केली प्रसूती  

Next
ठळक मुद्देसामाजिक भान बाळगत पोलिसांनी आजूबाजूच्या महिलांना बोलावले आणि त्यांच्या मदतीने महिला पोलिसांनी जिप्सी बाळंतिणीची सुखरूप प्रसूती केली.मंगळवारी रात्री दिल्लीच्या कोटला मुबारकपूर भागात असलेल्या लेबर कॅम्पमध्ये एका महिलेला प्रसूतीकळा सुरु झाल्या.

लॉकडाऊनदरम्यान पोलिसांच्या वेगवेगळी खाकीतली रूपं देशभरातून समोर येत आहेत. कुठे खूप कडक, कठोर आणि कुठेतरी खूप माणुसकी असलेल्या प्रतिमा आपण पाहिल्या. मंगळवारी रात्री दिल्लीच्या कोटला मुबारकपूर भागात असलेल्या लेबर कॅम्पमध्ये एका महिलेला प्रसूतीकळा सुरु झाल्या. कुटुंबातील सदस्यांना रुग्णवाहिका बोलवायची होती. पण ते करता आले नाही. अशा स्थितीत घटनास्थळी पोहोचलेल्या काही महिला पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला. सामाजिक भान बाळगत पोलिसांनी आजूबाजूच्या महिलांना बोलावले आणि त्यांच्या मदतीने महिला पोलिसांनी जिप्सी बाळंतिणीची सुखरूप प्रसूती केली. त्यामुळे जन्मलेल्या मुलाचे वडील खूप आनंदित झाले आहेत. 

 

पोलिसांनी केलेल्या या मोलाच्या मदतीमुळे बाळंतिणीने आणि तिच्या नवऱ्याने दिल्ली पोलिसांचे आभार मानले आहेत. जगासहित आपला देश देखील कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. त्यामुळेच देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना गैरसोयींना सामोरं जावं लागत आहे. मात्र, काही सामाजिक संस्था आणि पोलिसांनी सामाजिक बांधिलकी बाळगत अनेक ठिकाणी मदतीचा हात पुढे केला आहे. 

Web Title: Humanity in khaki! woman gave birth to child in police gypsy at delhi kotla mubarakpur pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.