शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

CoronaVirus: माणुसकी! मुलगा कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये, वृद्ध मातेचा मृत्यू; डॉक्टरने केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 2:19 PM

Humanity face in Corona Pandemic: वृद्ध महिला आणि तिचा मुलगा दोघांनाही कोरोनाची बाधा झाली होती. यात वृद्धेचा मृत्यू झाला तर मुलाला कोरोना असल्याने त्याला येता आले नाही. यामुळे या वृद्धेवर अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न उभा राहिला.

Corona Teach Humanity: देशात कोरोनाच्या संकटात (Corona Pandemic) जवळचे नातेवाईक पाठ फिरवत असताना परके लोक मदतीचा हात पुढे करत आहेत. अशी अनेक उदाहरणे आहेत. अनेकांच्या कुटुंबातील कर्ते, धर्ते कोरोनाने हिसकावले आहेत. अशा अडचणीच्या वेळी अनोळखी व्यक्ती मुलगा, आई-बाप, भावाचे कर्तव्य पाड पाडत आहेत. दिल्लीतील डॉक्टरने (Doctor) एका वृद्धेचा मृत्यू झाला, तिचा मुलगा कोरोनाशी झुंझत असताना तिच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत. (77 year old women died due to corona, her son in Hospital; Doctor did funeral on his mother. )

वृद्ध महिला आणि तिचा मुलगा दोघांनाही कोरोनाची बाधा झाली होती. यात वृद्धेचा मृत्यू झाला तर मुलाला कोरोना असल्याने त्याला येता आले नाही. यामुळे या वृद्धेवर अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न उभा राहिला. अखेर कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरांनीच पुढाकार घेतला आणि त्या वृद्धेचा मुलगा बनून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. यानंतर जेव्हा तिचा मुलगा बरा झाला तेव्हा त्याच्या हाती त्याच्या आईचा अस्थिकलश सोपवून माणुसकीचे एक उदाहरण ठेवले. 

हिंदुराव  हॉस्पिटलच्या डॉ. वरुण गर्ग यांनी सांगितले की, 5 मे ची घटना आहे. रात्री 10 वाजता त्यांच्या एका सहकारी डॉक्टरचा फोन आला. सरदार वल्लभ भाई कोविड हॉस्पिटलमध्ये 77 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. तिचा मुलगाही कोरोनाबाधित आहे. तिच्या घरातील लोक हरियाणावरून येऊ शकत नाहीएत. यामुळे तिच्यावर अंत्यसंस्कार होत नाहीत, असे सांगितले.

''हे ऐकून मला दु:ख झाले. मी लगेचच त्या मातेवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय़ घेतला. माझा मित्र त्या मुलावर उपचार करत होता. त्याला सांगितले की, त्या मुलाकडून मातेवर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी घे. मी स्वत: त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार आहे.'', असे डॉ. वरुण यांनी सांगितले. वरुण यांच्या कुटुंबियांनीही याचे स्वागत केले. आई, पत्नी, भावाने हा देवाचाच आदेश असेल असे सांगत पाठिंबा दिला. दुसऱ्या दिवशी मी सकाळी हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर गेलो आणि ड्युटी संपल्यावर सायंकाळी 5 वाजता त्या मातेवर अंत्यसंस्कार केले. निगमबोध घाटावर तिचा मृतदेह पोहचविण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी अस्थि घेवून मी त्याचा कलश लॉकरमध्ये ठेवला. 

मी जेव्हा काम करायचो तेव्हा मनात खूप प्रश्न उठत होते. एका मुलावर ओढवलेली लाचारी, समाजाने टाकलेला अघोषित बहिष्कार स्पष्ट दिसत होता. परंतू मला केलेल्या गोष्टीचे समाधान वाटत होते. 13 मे रोजी महिलेचा मुलगा बरा झाला. त्याला डिस्चार्ज मिळाल्यावर मी त्याच्या हाती तो अस्थीकलश सोपविला. त्यांच्या चेहऱ्यावर अंत्यसंस्कार न करू शकल्याचे दु:ख दिसत होते. कोरोनाची लढाई सर्वांनी मिळून लढाय़ला हवी, अशी वरुण यांनी विनंती केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर