शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

सीरम इन्स्टिट्यूटला मोठा धक्का; ऑक्सफर्डच्या लसीच्या मानवी चाचणीची परवानगी टाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 05:06 IST

Corona Vaccine परवानगी मिळविण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचा आदेश सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला या समितीने दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ तयार करत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या भारतात सुरू करण्यासंदर्भात परवानगी देण्याचे निर्णय घेण्याचे तज्ज्ञांच्या समितीने टाळले. ही परवानगी मिळविण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचा आदेश सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला या समितीने दिला आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठ अ‍ॅस्ट्राझेनिसा कंपनीच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक लस विकसित करत आहे. कमी व मध्यम स्तराचे उत्पन्न असलेल्या देशांसाठी या लसीचे उत्पादन करण्यासाठी अ‍ॅस्ट्राझेनिसाशी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने करार केला आहे.ऑक्सफर्ड विद्यापीठ बनवत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या भारतात सुरू करण्यासाठी सिरमने सुधारित प्रस्ताव सादर करावा, असे तज्ज्ञांच्या समितीने सांगितले. सिरमच्या प्रस्तावात आठ दुरुस्त्या सुचविण्यात आल्या आहेत. या घडामोडींमुळे मानवी चाचण्या सुरू करण्यासाठी सिरमला लगेच परवानगी मिळणे शक्य नाही. या विषयावर सिरमने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे.सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, ऑक्सफर्ड विद्यापीठ तयार करत असलेल्या लसीच्या दुसºया व तिसºया टप्प्यांतील मानवी चाचण्यांसाठी १६०० स्वयंसेवक हवेत, असे सिरम इन्स्टिट्यूटने आपल्या प्रस्तावात म्हटले आहे. त्याबाबत समितीने सिरमकडून आणखी माहिती मागविली आहे.रशियाने बनविलेल्या लसीची होणार १० किंवा १२ ऑगस्टला नोंदणीच्मॉस्को : रशियाने बनविलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीची त्या देशातील औषध नियंत्रकांकडे १० किंवा १२ आॅगस्टला नोंदणी करून त्यानंतर तीन ते सात दिवसांनी ती जनतेसाठी उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. जगात विविध देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी चाचण्या व प्रथम शोध कोण लावतो याबाबत स्पर्धा चाललेली असताना, त्यात रशिया बाजी मारणार, अशी चर्चा रंगू लागली आहे.च्मॉस्कोमधील गॅमेलिया रिसर्च इन्स्टिट्यूट आॅफ एपिडेमिआॅलॉजी अँड मायक्रोबायॉलॉजी (जीआरआयइएम) या संस्थेने ही कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे.च्या लसीच्या मानवी चाचण्यांचे तीनही टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे या महिन्याच्या प्रारंभी रशियाने जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती थोडी निराळी होती. या लसीच्या मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा जुलैच्या दुसºया आठवड्यात पूर्ण झाला होता. त्या चाचण्यांचा दुसरा टप्पा १३ जुलैला सुरू झाला, असे रशियाच्या तास या वृत्तसंस्थेने म्हटले होते.

च्कोणत्याही लसीच्या मानवी चाचण्यांचे तीन टप्पे पूर्ण झाल्याशिवाय तिचा वापर जनतेसाठी करण्यास परवानगी देण्यात येत नाही. मानवी चाचण्यांचा प्रत्येक टप्पा कित्येकदा काही महिन्यांपर्यंत सुरू राहातो. त्यामुळे रशियाने विकसित केलेल्या लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर तिसरा टप्पा टाळून तिच्या वापरास परवानगी देण्याचा घाट तेथील सरकारने घातला असावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जीआरआयइएम या संस्थेने तयार केलेल्या लसीची सशर्त नोंदणी करण्यात येईल, असे रशियातील औषध नियंत्रकांनी स्पष्ट केले आहे. या लसीला मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा पूर्ण करावाच लागेल. त्यानंतर या लसीचा जनतेसाठी वापर करण्याकरिता परवानगी मिळू शकेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या