हुडकेश्वरमध्येही सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: December 25, 2014 23:30 IST2014-12-25T23:30:51+5:302014-12-25T23:30:51+5:30
२६ नोव्हेंबरची घटना : महिनाभरानंतर गुन्हा दाखल

हुडकेश्वरमध्येही सामूहिक बलात्कार
२ नोव्हेंबरची घटना : महिनाभरानंतर गुन्हा दाखलनागपूर : कळमना पोलिसांकडे दाखल झालेल्या घटनेसारखीच सामूहिक बलात्काराची दुसरी एक घटना हुडकेश्वरमध्ये घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तब्बल महिनाभरानंतर, बुधवारी रात्री गुन्हे दाखल केले आहे. पीडित तरुणी २३ वर्षांची आहे. ती आपल्या मित्रासोबत २६ नोव्हेंबरच्या सायंकाळी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आऊटर रिंग रोडकडे फिरायला गेली होती. आरोपींनी तिला आणि मित्राला शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली. तिच्याजवळची चांदीची अंगठी आणि १५० रुपये हिसकावून घेतले. नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बदनामीच्या धाकापोटी तरुणी आणि तिच्या मित्रांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली नाही. अफरोज टोळीचे पाप चव्हाट्यावर आल्यानंतर आणि त्याला अटक केल्यानंतर २६ नोव्हेंबरला अशीच एक घटना घडल्याचे पोलीस तपासात उघड झाले. लोकमतने याबाबतचे वृत्त ठळकपणे प्रकाशित करून त्याचा खुलासा केला. त्यानंतर पीडित तरुणीने हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ---माहिती न देण्याचे आदेश ? पोलिसांनी गुन्हा दाखल केला मात्र त्याबाबत कमालीची गोपनीयता बाळगली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती देऊ नये, असे आदेश दिल्याचे हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील कर्मचारी सांगत होते. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी कोण आहेत, ते रात्रीपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. ----