हॅलो-४ आंबा बाजारात दाखल प्रमाण मात्र कमी
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:36+5:302015-02-18T00:13:36+5:30
आंबा बाजारात दाखल

हॅलो-४ आंबा बाजारात दाखल प्रमाण मात्र कमी
आ बा बाजारात दाखल प्रमाण मात्र कमी : ५०० रुपयांना तीन या दराने आंबेपणजी : फळांचा राजा आंबा सध्या बाजारपेठेचे आकर्षण ठरला आहे. सध्या येथील बाजारपेठेत आंबा दाखल झाला असून विक्रे ते ५०० रुपयांना तीन या दराने आंबे विकत आहेत. आंबे साधारणत: मार्च महिन्यात दाखल होतात. यंदा मात्र फेबु्रवारी महिन्यात मानकुराद आंबे उपलब्ध झाल्या कारणाने ग्राहकांना लवकरच त्यांची चव चाखायला मिळणार आहेत. बाजारपेठेत काही मोजक्याच विकेे्रत्यांकडे आंबे उपलब्ध असून या आंब्यांचे दर देखील जास्त आहेत, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. हापूस आंबा मात्र क्वचित एखाद्या विक्रे त्याकडे पाहायला मिळतो. हापूस आंबे देखील ५०० रुपयांना तीन आंबे या दराने विकले जात आहेत. गोव्यातील भाजी विक्रेत्या महिलांकडे मानकुराद आंबे जास्त करून विक्रीस ठेवलेले दिसतात. आंब्यांचे दर जास्त असल्या कारणाने ज्या ग्राहकांना हे दर परवडत नाहीत, ते केवळ दर ऐकून काढता पाय घेणे पसंत करतात. आंब्याचे शौकीन असलेले मात्र आवर्जून आंबे विकत घेत असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे. मानकुराद आंब्याचे पीक गोव्यात लवकर येत असल्या कारणाने यंदा फेबु्रवारी महिन्यातच आंबा दाखल झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. येथील रहिवासी दीपक गावकर या ग्राहकाने सांगितले की, आंबे दोन हजार रुपयांना डझन विकत घेणे सामान्य माणसांना परवडणारे नाही. सध्या आंबे योग्य प्रमाणात उपलब्ध झालेले नाहीत, त्यामुळे विक्रेत्यांनी दर वाढवलेला आहे. आंबे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर हेच आंबे ५०० रुपये डझन होतील. आंब्याच्या हंगामाला अजून खर्या पध्दतीने सुरुवात झालेली नाही.मार्च महिन्याच्या शेवटी आंबे मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होणार असून त्यानंतर आंब्यांच्या दरात जास्त प्रमाणात घट होणार आहे, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. आंब्याचा शेक (मँगो शेक) ग्राहकांची पसंती असली तरी ग्राहकांना अद्याप आंबा शेकचा आस्वाद घेता येत नाही. एका दुकानदाराने सांगितले की, आंबे कमी प्रमाणात उपलब्ध असून दरही जास्त आहे आणि त्यामुळे आंबा शेक विकण्यास सुरुवात केलेली नाही. आंबा शेकची किंमत साधारणत: साठ रुपये असते, त्यामुळे पाचशे रुपयांना तीन आंबे घेणे, हे परवडणारे नाही. आठवड्यापूर्वी बाजारपेठेत आंब्यांचे जसे दर होते त्यात काही मोठा फरक झालेला दिसत नाही. हवामानातील बदलामुळे आंब्याचे पीक यंदा लवकर आले आहे. मार्च महिन्याअखेरीस ग्राहकांना कमी दरात आंबे विकत घेता येणार असल्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)