Howdy Modi: ...म्हणून मोदींनी अमेरिकी सिनेटरच्या पत्नीची मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 14:53 IST2019-09-23T14:44:59+5:302019-09-23T14:53:31+5:30
मोदींनी अमेरिकी सिनेटर जॉन कॉर्निक यांच्या पत्नीची माफी मागितली आहे.

Howdy Modi: ...म्हणून मोदींनी अमेरिकी सिनेटरच्या पत्नीची मागितली माफी
ह्युस्टनः पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हाऊड मोदी हा कार्यक्रम जल्लोषात पार पडला आहे. परंतु यादरम्यान मोदींनी अमेरिकी सिनेटर जॉन कॉर्निक यांच्या पत्नीची माफी मागितली आहे. मोदींनी जॉन कॉर्निक यांच्या पत्नीची माफी मागितल्यामुळे हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय. खरं तर कॉर्निन यांनी पत्नीच्या जन्मदिवशीच 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात उपस्थिती लावली. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त घरी न थांबता कॉर्निन यांनी मोदीच्या कार्यक्रमाला जाण्यास पसंती दिली. मोदींना जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांनी लागलीच त्या सिनेटर यांच्या पत्नीची माफी मागितली.
पंतप्रधान कार्यालयानं ट्विटर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मोदी कॉर्निन यांची पत्नी सँडी हिची माफी मागताना पाहायला मिळत आहेत. तसेच कॉर्निन यांची पत्नी सँडी हिला मोदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तर दुसरीकडे सँडी यांचे पती कॉर्निन हे मोदींबरोबर असल्याचं दिसत आहे.
मोदी सँडी यांना उद्देशून म्हणाले, मी तुमची माफी मागू इच्छितो, कारण आज तुमचा जन्मदिवस आहे. तुमचे जीवनसाथी माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे खरं तर तुम्हाला माझ्याबद्दल काहीशी असूया वाटत असावी. तरीही मी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मी तुमच्या सुखी आणि समृद्ध भविष्याची प्रार्थना करतो. टेक्सासचे सिनेटर जॉन कार्निन आणि सँडी यांच्या लग्नाला 40 वर्ष लोटली आहे. त्यांना दोन मुलीसुद्धा आहेत. कॉर्निन हाऊडी मोदी कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या प्रमुख खासदारांपैकी एक आहेत.Here is what happened when PM @narendramodi met Senator @JohnCornyn. pic.twitter.com/O9S1j0l7f1
— PMO India (@PMOIndia) September 23, 2019