शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

भाजप 370 चे लक्ष्य कसे गाठणार? कुठून मिळणार मदत? नितीन गडकरी स्पष्टच बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 17:48 IST

'आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप 370 आणि एनडीए 400 पार करणार.'

Nitin Gadkari on Lok Sabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप 370 आणि एनडीए 400 पार करणार, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे सर्व नेते करत आहेत. आता भाजप ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही यावर भाष्य केले. गडकरींनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला, यावेली त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 370 जागांच्या टार्गेटवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. तसेच, भाजप 370 चा आकडा कसा गाठणार, हेदेखील सांगितले. 

नितीन गडकरी म्हणाले की, पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपद भूषवतील, कारण सरकारने गेल्या 10 वर्षांत अनेक ठोस कामे केली आहेत. भाजप नेतृत्वाखालील एनडीए 400 जागांचा आकडा पार करेल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. सध्या अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा मोदी सरकार वापर करत असल्याचे विरोधकांचे आरोप फेटाळून लावत गडकरी म्हणतात, विरोधकांनी जनतेचा विश्वास मिळवून परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

10 वर्षांच्या कामाचे परिणाम...यावेली गडकरींनी 370 जागांचे गणित समजावून सांगितले. ते म्हणाले, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षाने गेल्या 10 वर्षात दक्षिण आणि ईशान्य भागात खूप काम केले आहे, ज्याचे परिणाम यंदाच्या लोकसभा निवढणुकीत दिसतील. गेल्या काही वर्षांत कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भाजप मजबूत झाला आहे. आम्ही तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये खूप मेहनत घेतली. गेल्या काही वर्षांत पक्षाने उत्तर भारतातही चांगली कामे केली. दक्षिणेत भाजपचे अस्तित्व कमी आहे, परंतु यंदा दक्षिणेत आमची कामगिरी चांगली असेल. त्यामुळेच एकट्या भाजपला 370 जागा मिळतील आणि एनडीए 400 चा आकडा पार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार देशाच्या विकासाबाबत बोलताना गडकरी म्हणाले, देशातील जनतेला विकास पहायचा आहे, त्यामुळेच त्यांचा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे. निवडणुकीत हा विश्वास स्पष्टपणे दिसून येईल. यंदाही आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल आणि आम्ही 400 चा आकडाही पार करू. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असेही गडकरींनी यावेळी स्पष्ट सांगितले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी