शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
2
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
3
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
4
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
5
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
6
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
7
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
8
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
11
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
12
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
13
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
14
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
16
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
17
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
18
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
19
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
20
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा

पाच वर्षांत १३ लाखांवरून ४ कोटी कसे कमविले; तेजस्वी सूर्यांनी सांगितला गुंतवणुकीचा मार्ग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 14:48 IST

BJP Tejasvi Surya Net Worth Rise : सूर्या यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बंगळुरु दक्षिणमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी त्यांनी त्यांची संपत्ती ४.१० कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे.

२०१९ च्या तुलनेत खासदारांच्या संपत्तीमध्ये २०२४ मध्ये कमालीची वाढ झालेली आहे. सर्वात तरुण खासदार भाजपाचे नेते तेजस्वी सूर्या यांच्या संपत्तीमध्ये कैकपटींनी वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती १३ लाखांवरून वाढून ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. ही एवढी वाढ कशी झाली याची माहिती सूर्या यांनीच दिली आहे. 

सूर्या यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बंगळुरु दक्षिणमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी त्यांनी त्यांची संपत्ती ४.१० कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. २००९ मध्ये त्यांनी 13.46 लाख रुपये संपत्ती असल्याची जाहीर केले होते. पाच वर्षांत त्यांची संपत्ती 3.97 कोटी रुपयांनी वाढली आहे. सूर्या यांनी या वाढलेल्या संपत्तीचा स्रोतही सांगितला आहे. त्यांनी शेअर बाजारात 1.79 कोटी रुपये आणि म्युच्युअल फंडामध्ये 1.99 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. संपत्तीमध्ये अचानक एवढ्या वाढीला सूर्या यांनी शेअर आणि म्यूचुअल फंडाची मोठी भुमिका असल्याचे म्हटले आहे. 

सूर्या यांनी एका बिझनेस चॅनेलला मुलाखत दिली, यात त्यांनी यावर भाष्य केले. एसआयपी, म्युच्युअल फंड आणि स्टॉक्सद्वारे तुम्ही बाजारात पैसे गुंतवून मोठा फायदा कमवू शकता असे ते म्हणाले. अशाप्रकारे केलेल्या गुंतवणुकीचा देशातील अनेकांना फायदा झाला आहे, त्यातील मी एक आहे, असे सूर्या म्हणाले. 

तेजस्वी सूर्या यांच्या म्युच्युअल फंडामध्ये २६ वेगवेगळे फंड आहेत. यामध्ये कॅनरा रोबेको मल्टी कॅप फंड, एचडीएफसी मल्टी कॅप फंड, कोटक स्मॉल कॅप फंड आणि आयसीआयसीआय प्रुडेशिंअल स्मॉल कॅप फंड आहेत. तर इक्विटी फंडामध्ये इंडस टावर्स, एवरेडी इंडस्ट्रीज इंडिया, बीएसई लिमिटेड आणि स्ट्राइड्स फार्मा सारख्या कंपन्यांचे शेअर्स आहेत. गेल्या पाच वर्षांत शेअर बाजार चढाच आहे. यामुळे याचा फायदा गुंतवणूक दारांना होत आहे. 

टॅग्स :Tejasvi Suryaतेजस्वी सूर्याBJPभाजपाshare marketशेअर बाजारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४bangalore-south-pcबंगलोर दक्षिण