शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

"सुशांत कसा आहे?"... आत्महत्येच्या धक्क्यानं वहिनीनं सोडला प्राण, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 10:23 IST

सुशांतने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कूपर रुग्णालयात रविवारी रात्रीच तीन डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर शवविच्छेदन केले.

पूर्णिया : मालिकांमधून महिलांच्या मनातील हिरो बनलेला बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या घरावर दुसरा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुशांतचा मृत्यू देशभरातील महिलांच्या मनाला चटका लावून गेला. तसेच सुशांतच्या वहिनीलाही सुशांतच्या आत्महत्येचा मोठा धक्का बसला होता. हा धक्का ती पचवू शकली नाही. 

सोमवारी मुंबईमध्ये सुशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा धक्का पचवत नाहीत तोच घरातील आणखी एक सदस्याने प्राण सोडले. जेव्हा सुशांतवर अंत्यसंस्कार होत होते, तेव्हा बिहारमध्ये राहणाऱ्या त्याच्या भावाची बायको सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्याने बेशुद्ध झाली होती. सुशांतचा मृत्यू झाल्याचे कळताच तिने अन्न पाणी सोडले होते. 

सुशांतच्या चुलत भावाची पत्नी सुधा देवी ही सुशांतच्या मूळ गावी पूर्णियाच्या मलडीहा येथे राहत होती. सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकताच तिची तब्येत बिघडली होती. तिने अन्न पाणी सोडले होते. सुशांतच्या मृत्यूचा मोठा धक्का तिच्या मनावर बसला होता. एकीकडे सुशांतवर अंतिम संस्कार केले जात होते, दुसरीकडे सुधा देवी हीने प्राण सोडले होते. 

सुधा देवी काही काळापासून आजारी होती. मात्र, सुशांतच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर तिची तब्येत आणखी बिघडली. धक्क्यामुळे ती वारंवार बेशुद्ध होत होती. तिच्या पतीने डॉक्टरांनाही बोलावले होते. मात्र, औषधांचा तिच्यावर काहीच फरक जाणवला नाही. जेव्हा ती शुद्धीवर यायची तेव्हा केवळ सुशांत कसा आहे? एवढेच विचारत होती. परत घरासमोरील गर्दी पाहून ती बेशुद्ध होत होती. 

सुधा देवीचा पती आणि सुशांतचा चुलत भाऊ अमरेंद्र सिंग याने  सांगितले की, सोमवारी सकाळी सुधा देवीची तब्येत बिघडली. सायंकाळी पाच वाजता तिने शेवटचा श्वास घेतला. आधी भाऊ सोडून गेला, आता पत्नी, कोणासाठी जिवंत राहू, असे दु:ख त्यांनी व्यक्त केले. 

 सुशांतची आत्महत्यासुशांतने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कूपर रुग्णालयात रविवारी रात्रीच तीन डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर शवविच्छेदन केले. सोमवारी शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून त्याने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती वांद्रे पोलिसांनी दिली. आत्महत्येपूर्वी त्याने कुठलेही व्यसन केले नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले. त्याच्या बँक खात्यातील तपशिलानुसार त्याला आर्थिक अडचण नसल्याचेही पोलिसांच्या माहितीत समोर आले आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

खाट का कुरकुरतेय? विधान परिषदेवरून शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा

TikTok ची कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत?; व्हिडीओ अ‍ॅप बंद करणार

भविष्यवाणी! भारतावर मोठे संकट; 4.4 डिग्रीने पारा चढणार

जग दुसऱ्या मोठ्या महामारीच्या उंबरठ्यावर; सिंहाच्या हाडांपासून औषध, मद्याची निर्मिती घातक

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याBiharबिहार