TikTok ची कंपनी भारतातून व्हिडीओ अ‍ॅप बंद करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 09:01 AM2020-06-16T09:01:47+5:302020-06-17T12:26:12+5:30

एप्रिल 2020 मध्ये टिकटॉकने 100 कोटींपेक्षा जास्त आकडा पार केला होता. कमी कालावधीच्या व्हिडीओमुळे युजर टिकटॉकला पसंती देत आहेत.

TikTok's company ByteDance will roll up Vigo and Vigo Lite video app from India | TikTok ची कंपनी भारतातून व्हिडीओ अ‍ॅप बंद करणार

TikTok ची कंपनी भारतातून व्हिडीओ अ‍ॅप बंद करणार

Next

नवी दिल्ली : टिकटॉक अ‍ॅप बनविणारी कंपनी बाइटडान्स (ByteDance) भारतातून भारतातून दोन अ‍ॅप बंद करणार आहे. यामध्ये टिकटॉक नाही तर वीगो विडियो (Vigo Video)  आणि वीगो लाइट (Vigo Lite) या दोन अ‍ॅपचा समावेश आहे. 


बाइटडान्स कंपनीने वीगोवरील युजरना त्यांचा डेटा टिकटॉक अ‍ॅपवर ट्रान्सफर करण्याची सूचना केली आहे. कंपनीने वीगो व्हिडीओच्या एका वेबसाईटवर ही माहिती दिली आहे. वीगोची अ‍ॅप 31 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहेत. तोयपर्यंत युजर टिकटॉकवर ट्रान्सफर होऊ शकणार आहेत. 
Entracker नुसार हे अ‍ॅप ब्राझील आणि मध्ये पूर्वेतील देशांमध्ये बंद करण्यात आले आहे. कंपनीचे म्हणने आहे की, हे अ‍ॅप बंद करून कंपनी दुसऱ्या व्यवसायाकडे लक्ष देणार आहे. कंपनीने हे व्हिडीओ मेकिंग अ‍ॅप 2017 मध्ये लाँच केले होते या प्लॅटफॉर्मवर 15 सेकंदांपर्यंत व्हिडीओ बनविले जाऊ शकतात. या अ‍ॅपवर वेगवेगळे डान्स, फूड, स्टंट, ब्युटी, आर्ट, कॉमेडी, म्युझिक सारखे व्हिडीओ तयार केले जाऊ शकत होते. 


गुगल प्ले स्टोअरवर वीगो अ‍ॅपला 100 मिलिअनपेक्षा जास्त वेळा डाऊनलोड केले गेले होते. हा आकडा जगभरातील डाऊनलोडचा आहे. मात्र, भारतात टिकटॉक खूप प्रसिद्ध झालेले आहे. यामुळे वीगो अ‍ॅपला जास्त प्रतिसाद मिळाला नाही. भारतात वीगोचे ४ मिलिअन युजर तर लाईट अ‍ॅपचे 1.5 मिलिअन युजर आहेत. 


एप्रिल 2020 मध्ये टिकटॉकने 100 कोटींपेक्षा जास्त आकडा पार केला होता. कमी कालावधीच्या व्हिडीओमुळे युजर टिकटॉकला पसंती देत आहेत. यामध्ये युजर स्वत:चे व्हिडीओ पोस्ट करण्याबरोबरच दुसऱ्यांचे व्हिडीओ पाहून मनोरंजन करता येते. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने बरेचजण घरात होते. यामुळे टिकटॉक अ‍ॅपवर व्हिडीओंचा पूर आला होता. तसेच डाऊनलोडही वाढले होते. यामुळे टिकटॉक आता फेसबुकच्या Lasso, इन्स्टाग्रामला कडवी टक्कर देत आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

"सुशांत कसा आहे?" मृत्यू सहन होईना; वहिनीने सोडला प्राण

भविष्यवाणी! भारतावर मोठे संकट; 4.4 डिग्रीने पारा चढणार

जग दुसऱ्या मोठ्या महामारीच्या उंबरठ्यावर; सिंहाच्या हाडांपासून औषध, मद्याची निर्मिती घातक

दंग्याचा त्रास होत होता; शेजाऱ्याच्या दोन मुलांना चौथ्या मजल्यावरून फेकले

CoronaVirus जून-जुलै नाही, नोव्हेंबर धोक्याचा! कोरोना उत्पात माजवणार; ICMR चा अंदाज

Web Title: TikTok's company ByteDance will roll up Vigo and Vigo Lite video app from India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.