शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

‘बाय नाऊ, पे लेटर’ खरेदीत किती शहाणपण? जाणून घ्या नफा-नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 10:20 IST

साधारणत: तीन किंवा त्यापेक्षा अधिक हप्त्यात पेमेंट करण्याची सुविधा खरेदीदारास मिळते.

ई-कॉमर्स कंपन्यांच्या ‘बाय नाऊ, पे लेटर’ (बीएनपीएल) योजनांचा व्याप देशात वाढत चालला आहे. यात आता खरेदी करून पैसे नंतर अदा करण्याची सुविधा असते. पैसे देण्यासाठी १५ ते ४५ दिवसांचा अवधी असतो. पेमेंटच्या तारखेला खरेदीची रक्कम तुमच्या बँक खात्यात डेबिट होते. एकरकमी भरणा करायचा नसेल, तर देय रक्कम समान हप्त्यात रूपांतरित करून घेण्याचा पर्यायही यात असतो. ही सुविधा उपलब्ध करून देणारी कंपनी विक्रेत्यास पेमेंट करून टाकते. साधारणत: तीन किंवा त्यापेक्षा अधिक हप्त्यात पेमेंट करण्याची सुविधा खरेदीदारास मिळते.

३००००पर्यंत खरेदीची सोय ठरावीक अवधीत परतफेड केल्यास बीएनपीएलवर व्याज लागत नाही. मुदतीच्या आत पैसे भरले न गेल्यास मात्र व्याज आकारले जाते. व्याज मुक्त परतफेडीचा अवधी साधारणत: १५ ते ४५ दिवसांचा असतो. कर्ज मर्यादा ५०० रुपये ते ३० हजार रुपये इतकी असते. 

बीएनपीएलचे फायदेबीएनपीएलमध्ये तात्काळ कर्ज उपलब्ध होते. यातील देवघेव अत्यंत सुरक्षित असते. ईएमआयमध्ये व्याज नसते. परतफेड अवधी निवडण्याचा पर्याय उपलब्ध असतो. गॅजेट्स, फूड डिलिव्हरी, प्रवासाचे तिकीट बुकिंग, किराणा सामान व अन्य खर्चासाठी बीएनपीएलचा वापर केला जाऊ शकतो.

वैयक्तिक कर्जवैयक्तिक कर्जात मूळ रकमेवर व्याज लागते. बीएनपीएलमध्ये कोणतेही व्याज लागत नाही. वैयक्तिक कर्ज सुरक्षित आणि असुरक्षित असे दोन्ही प्रकारच्या कर्ज श्रेणीत उपलब्ध असते. बीएनपीएल मात्र केवळ सुरक्षित कर्ज श्रेणीतच उपलब्ध असते. बीएनपीएलमध्ये पैशाचा वापर मर्यादित आहे. वैयक्तिक कर्जात पैसे कसे खर्च करायचे यावर काेणतेही  बंधन नसते.

क्रेडिट कार्ड आणि बीएनपीएल यांवरील खरेदी जवळपास सारखीच असते. मात्र, दोन्हींत थोडासा फरकही आहे. क्रेडिट कार्डचा वापर पेमेंट मोड स्वीकार करणाऱ्या व्यावसायिकांसोबत केला जाऊ शकतो. बीएनपीएलचा वापर मात्र केवळ एका भागीदार व्यावसायिकासोबतच केला जाऊ शकतो. 

क्रेडिट कार्डावर काही छुपे शुल्क लागतात. बीएनपीएल मात्र पारदर्शक आणि कमी खर्चाचे मॉडेल आहे. क्रेडिट कार्डासाठी क्रेडिट स्कोअर आणि उत्पन्न मर्यादा यांसारखे कडक पात्रता नियम  असतात. बीएनपीएल सुविधा सहज उपलब्ध होते.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रonlineऑनलाइनShoppingखरेदी