डोनाल्ड ट्रंप यांच्या भारत दौऱ्यावर किती खर्च झाला..? RTIद्वारे समरो आली मोठी माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 02:42 PM2022-08-18T14:42:47+5:302022-08-18T14:43:38+5:30

2020 मध्ये डोनाल्ड ट्रंप यांच्या भारत दौऱ्यात नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

How much Money was spent on Donald Trump's visit to India..? Big information came through RTI... | डोनाल्ड ट्रंप यांच्या भारत दौऱ्यावर किती खर्च झाला..? RTIद्वारे समरो आली मोठी माहिती...

डोनाल्ड ट्रंप यांच्या भारत दौऱ्यावर किती खर्च झाला..? RTIद्वारे समरो आली मोठी माहिती...

Next

नवी दिल्ली: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 2020 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. डोनाल्ड यांच्यासाठी 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या स्वागतासाठी भारत सरकारने गुजरातमध्ये भव्य-दिव्य तयारी करण्यात आली होती. ट्रम्प यांच्या त्या 36 तासांच्या दौऱ्यावर केंद्र सरकारने किती खर्च केला, याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने केंद्रीय माहिती आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने ट्रम्प यांच्या दौऱ्यावर सुमारे 38 लाख रुपये खर्च केले आहेत.

अहमदाबाद, आग्रा, नवी दिल्लीला भेट दिली
एका आरटीआयद्वारे परराष्ट्र मंत्रालयाकडून ट्रम्प यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमाबाबत माहिती मागवण्यात आली होती. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या पहिल्या भारत दौऱ्यावर ट्रम्प यांनी पत्नी मेलानिया, मुलगी इवांका, जावई जेरेड कुशनर आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत 24,25 फेब्रुवारीला अहमदाबाद, आग्रा आणि नवी दिल्लीला भेट दिली होती.

ट्रम्प यांनी 24 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये तीन तास घालवले होते. यादरम्यान त्यांनी 22 किमी लांबीच्या रोड शोमध्ये भाग घेतला. यानंतर, साबरमती आश्रमात महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आणि नव्याने बांधलेल्या मोटेरा क्रिकेट स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत "नमस्ते ट्रम्प" सभेला संबोधित केले. यानंतर ट्रम्प त्याच दिवशी ताजमहाल पाहायला गेले. 25 फेब्रुवारी रोजी त्यांनी नवी दिल्लीला भेट दिली, तिथे त्यांची मोदींशी द्विपक्षीय चर्चा झाली.

24 ऑक्टोबर 2020 रोजी आरटीआय 
मिळालेल्या माहितीनुसार, आरटीआय कार्यकर्त्याने 24 ऑक्टोबर 2020 रोजी आरटीआय दाखल केला होता, परंतु त्याला सरकारकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर अर्जदाराने पहिले अपील दाखल केली आणि नंतर आरटीआय प्रकरणांमध्ये सर्वोच्च अपीलीय प्राधिकरण असलेल्या आयोगाशी संपर्क साधला. कोविडच्या प्रादुर्भावामुळे आरटीआयला उत्तर देण्यास विलंब झाल्याचे परराष्ट्र मंत्री म्हणाले होते. यानंतर, या वर्षी 4 ऑगस्ट रोजी परराष्ट्र मंत्रालयाने आयोगाला आरटीआयची माहिती दिली.
 

Web Title: How much Money was spent on Donald Trump's visit to India..? Big information came through RTI...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.