नितीश कुमार यांनी आतापर्यंत किती वेळा बदलली भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 09:14 AM2024-01-28T09:14:52+5:302024-01-28T09:15:52+5:30

Nitish Kumar : बिहारच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा उलटफेर होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार महागठबंधन आघाडीतून एनडीए गटात जाण्याची चर्चा जोर धरत आहे. राजकीय भूमिका बदलण्याची नितीश कुमार यांची ही पहिलीच वेळ नाही. आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा राजकीय अदलाबदलीचा खेळ केला आहे.

How many times has Nitish Kumar changed roles so far? | नितीश कुमार यांनी आतापर्यंत किती वेळा बदलली भूमिका?

नितीश कुमार यांनी आतापर्यंत किती वेळा बदलली भूमिका?

पाटणा - बिहारच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा उलटफेर होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार महागठबंधन आघाडीतून एनडीए गटात जाण्याची चर्चा जोर धरत आहे. राजकीय भूमिका बदलण्याची नितीश कुमार यांची ही पहिलीच वेळ नाही. आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा राजकीय अदलाबदलीचा खेळ केला आहे.

१९९४ - समता पार्टीची स्थापना
जनता दलात सक्रिय असलेल्या नितीश कुमार यांनी १९९४ मध्ये समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस, ललन सिंह यांच्यासह समता पार्टी स्थापन केली. १९९५ च्या निवडणुकीवेळी त्यांनी डाव्यांशी युती केली, मात्र पराभूत झाले.
१९९६ : एनडीएत प्रवेश
पराभवानंतर डाव्यांशी फारकत घेत १९९६ मध्ये एनडीएत आले. २०१३ पर्यंत १७ वर्षे ते भाजपसोबत होते. 
२०१३ : एनडीएतून बाहेर
२०१४ च्या लोकसभेसाठी भाजपने पंतप्रधानपदासाठी मोदी यांना पुढे केल्याने नितीश कुमार यांचा भ्रमनिरास झाला. ते स्वबळावर लढले. परंतु जदयूला २ जागा जिंकता आल्या.
२०१५ - काँग्रेस-राजदशी युती
२०१५ च्या विधानसभा निवडणुकीसाठी नितीश कुमार यांनी काँग्रेस-राजदशी युती केली. भाजपचा पराभव करत त्यांनी सरकार स्थापन केले.
२०१७ : भाजपशी पुन्हा युती
तेजस्वी यादव यांचे आयआरसीटीसी घोटाळ्यात नाव आल्याने कुमार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. २०२० च्या निवडणुकीत जेडीयूला ४३ जागा, तर भाजपला ७४ जागा मिळाल्या. 
२०२२ : पुन्हा महागठबंधनकडे 
भाजपसोबतची युती तोडत नितीश कुमार पुन्हा एकदा महागठबंधनकडे आले. राजद, काँग्रेससोबत त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वतःकडे ठेवली. आता त्यांनी भाजपशी हातमिळवणीची तयारी केली आहे.

यंदा भूमिका का बदलली? 
- ‘इंडिया’चे संयोजकपद न मिळणे 
- जागावाटपाबाबत होणारा विलंब 
- इंडिया’त राजकीय भवितव्य नाही
- भाजपच्या दिशेने असलेले राजकीय वारे 
- प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न

Web Title: How many times has Nitish Kumar changed roles so far?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.