शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
2
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
3
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
4
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
7
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
8
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
9
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
10
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
11
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
12
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
13
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
14
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
15
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
16
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
17
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
18
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
19
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
20
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 12:01 IST

बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. तर बहुमतासाठी एकूण 122 जागांची आवश्यकता असते. दरमयान एक नवा धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिनेच शिल्लक असून राजकीय वातावरण जबरदस्त तापल्याचे दिसत आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. तर बहुमतासाठी एकूण 122 जागांची आवश्यकता असते. दरमयान एक नवा धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे.

एनडीएला किती जागा मिळणार? -खरे तर, टाईम्स नाऊ आणि जेव्हीसीने हा ताजा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला 130 ते 150 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, यात भाजप एकट्याच्या बळावर 66 ते 77 जागा जिंकू शकते, तर मुख्यमंत्री नीतीश कुमार यांची जनता दल (युनायटेड) 52 ते 58 जागांवर विजय मिळवू शकते. एनडीएतील इतर सहकाऱ्यांना 13 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

महागठबंधनला किती जागा? -महागठबंधनचा विचार करता, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला 81 ते 103 जागा मिळू शकतात, असे सर्व्हेमध्ये म्हणण्यात आले आहे. यात राजद (RJD) 57 ते 71 जागांवर आघाडी घेऊ शकते, तर काँग्रेसला 11 ते 14 जागांवरच विजय मिळण्याची शक्यता आहे. इंडिया ब्लॉकमधील इतरांना 13 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

यावेळी जन सुराजचीही एंट्री... -यावेळी, प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यांच्या पक्षाला 4 ते 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. ही आकडेवारी लहान वाटत असली तरीही, निवडणूक अटीतटीची झाली, तर सत्तेच्या गणितात प्रशांत किशोर ‘किंगमेकर’ही ठरू शकतात. महत्वाचे म्हणजे, 2020 मध्ये झालेल्या बिहार निवडणुकीत AIMIM ने 5 जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यांचा ग्राफ घसरताना दिसत आहे. याशिवाय, मायावतींची बसपा आणि इतरांना मिळून 5-6 जागांवरच समाधान मानावे लागू शकते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Election Survey: NDA Likely to Win, Tejashwi's Performance Key

Web Summary : Bihar's upcoming election shows NDA likely winning 130-150 seats, BJP leading. Mahagathbandhan, led by Tejashwi Yadav, could secure 81-103 seats. Prashant Kishor's party might be a kingmaker.
टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूक 2024BJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारPrashant Kishoreप्रशांत किशोर