जगातील प्रमुख विमान कंपन्यांकडे एकूण किती विमाने आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 12:00 IST2025-06-13T11:59:44+5:302025-06-13T12:00:17+5:30

Airplane News: जगभरात सध्या सुमारे ५५ हजार विमानांचा ताफा आहे. यातील २८,६७४ विमाने ही नागरिक प्रवासी व मालवाहतुकीसाठी वापरली जात आहेत. युनायटेड एअरलाइन्सकडे जगात सर्वाधिक १,०३७ विमाने आहेत.

How many planes do the world's major airlines have in total? | जगातील प्रमुख विमान कंपन्यांकडे एकूण किती विमाने आहेत?

जगातील प्रमुख विमान कंपन्यांकडे एकूण किती विमाने आहेत?

नवी दिल्ली - जगभरात सध्या सुमारे ५५ हजार विमानांचा ताफा आहे. यातील २८,६७४ विमाने ही नागरिक प्रवासी व मालवाहतुकीसाठी वापरली जात आहेत. युनायटेड एअरलाइन्सकडे जगात सर्वाधिक १,०३७ विमाने आहेत. यानंतर अमेरिकेन एअरलाइन्सचा नंबर लागतो. इंडिगोकडे ४३७ विमाने आहेत.

जगातील सर्वात मोठा विमान ताफा कुणाकडे? 
जगातील सर्वात मोठा प्रवासी विमान ताफा हा युनायटेड एअरलाइन्सकडे आहे. त्यांच्याकडे बोइंग आणि एअरबस दोन्ही प्रकारचे विमाने आहेत. अमेरिकन एअरलाइन्समध्ये मुख्यत: बोइंग ७३७ आणि एअरबस ए ३२० विमाने वापरली जातात. डेल्टा एअरलाइन्स ही बोइंग आणि एअरबस दोन्ही वापरणारी जुनी व मोठी कंपनी आहे. चायना सदर्न एअरलाइन्स ही चीनमधील सर्वात मोठी एअरलाइन आहे.

Web Title: How many planes do the world's major airlines have in total?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.