शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

प्रद्युम्नची हत्या करणाऱ्या विद्यार्थ्याने पोलिसांना कसा दिला गुंगारा, सीबीआय करणार तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 12:09 IST

गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थी प्रद्युम्न याच्या हत्येच्या तपासामधून दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या हत्येप्रकरणी अकरावीतील एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.

गुरुग्राम/नवी दिल्ली - गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थी प्रद्युम्न याच्या हत्येच्या तपासामधून दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या हत्येप्रकरणी अकरावीतील एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. दरम्यान, प्रद्युम्नच्या हत्येनंतर आरोपी विद्यार्थ्याने पोलिसांना कसा काय गुंगारा दिला याचा तपास सीबीआय करणार आहे. प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी पोलिसांचे लक्ष महत्त्वपूर्ण पुराव्यांकडे कसे काय गेले नाही, हा प्रश्न पोलिसांची या प्रकरणातील भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आणत आहे. प्रद्युम्नची हत्या करणारा खरा गुन्हेगार कोण आहे, याची गुरुग्राम पोलिसांना आधीपासूनच माहिती असावी आणि त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेले, असा सीबीआयला संशय आहे. या हत्येप्रकरणी 11वीमधील विद्यार्थ्याला दोषी मानल्यानंतर सीबीआयने ही हत्या पूर्वनियोजित असल्याच्या दिशेने तपास सुरू केला आहे. प्रद्युम्नची हत्या  त्याच विद्यार्थ्याने केल्याची पुष्टी करणाने अनेक पुरावे सीबीआयला मिळाले आहेत. आता या प्रकरणात ल्याला वाचवण्यामध्ये कोण कोण सहभागी होते याचा तपास होत आहे. आता या प्रकरणात महिन्याभरामध्ये सीबीआयकडून आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.  प्रद्युम्नची हत्या त्याच विद्यार्थ्याने केली आहे, याची माहिती शाळेचे प्रशासन आणि पोलिसांना होती. तसेच या हत्याकांडाचे पुरावे मिटवण्यासाठी मोठे षडयंत्र रचण्यात आले होते, असा दावा सीबीआयने केला आहे. या प्रकाराचा छडा लावण्यासाठी सीबीआयने संबंधित पोलीस, शालेय प्रशासन आणि शाळेतील अनेक कर्मचाऱ्यांची चौकशी केली आहे. तसेच सीबीआयने सोमवारी गुरुग्राम पोलिसांच्या स्पेशल इन्वेस्टिगेशन टीमलाही चौकशीसाठी बोलावले होते.  10 दिवस तपास करूनही पोली एवढे मह्त्त्वपूर्ण पुरावे का गोळा करू शकली नाही याची विचारणा एसआयटीकडे करण्यात आली. आम्ही  सीसीटीव्ही फुटेज वारंवार पाहिले, तसेच 100 हून अधिक जणांची चौकशी केली. मात्र  सीबीआयने ज्या विद्यार्थ्याला आरोपी बनवले त्याला आपण मुख्य साक्षीदार मानत होतो, असा दावा एसआयटीने केला आहे.  प्रद्युम्नच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयने या हत्येप्रकरणी अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला अटक केली होती. आता त्याने गुरुग्राम पोलिसांना कसा काय गुंगारा दिला याचा तपास करण्यात येणार आहे.   गुरगावच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी अकरावीतील विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने आपला तपास इतर विद्यार्थ्यांच्या दिशेने वळवला आहे. या हत्येत इतर विद्यार्थीही सहभागी असावेत, असा संशय आहे. आणखी चार विद्यार्थ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता असली तरी अधिकारी आताच याविषयी बोलण्यास तयार नाहीत. चारपैकी एका विद्यार्थ्याची चौकशीही झाली आहे.शुक्रवारी रायन स्कूलच्या माजी कर्मचा-यांचीही चौकशी झाली. पोलिसांना एक चाकू हस्तगत केला असून, तो तपासातील मुख्य पुरावा ठरू शकेल. प्रद्युम्नच्या हत्येनंतर शाळा प्रशासन व आरोपी विद्यार्थ्याचे नातेवाईक यांनी पोलिसांशी संगनमत करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला का, याचाही सीबीआय तपास करीत आहे.

टॅग्स :Pradhyumn murder caseप्रद्युम्न हत्या प्रकरणRyan International Schoolरेयान इंटरनॅशनल स्कूलCrimeगुन्हाPoliceपोलिस