शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

नितीश कुमारांनी पलटी मारली, तरीही भाजप स्थापन करू शकतं NDA सरकार; असं आहे संपूर्ण समिकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 18:13 IST

...अशा एकूण परिस्थितीत, सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत त्या नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याकडे.

लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालात कोणत्याही पक्षाला बहुमतापर्यंत पोहोचता आलेले नाही. भाजप 240 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमतापासून 32 जागा दूर आहे. यामुळे सत्ता स्थापनेसंदर्भात सस्पेंस निर्माण झाला आहे. दरम्यान, भाजपला बहुमत मिळालेले नाही आणि आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करू, असे I.N.D.I.A.चे तेजस्वी यादव आणि पवन खेडा यांसारख्या नेत्यांनी म्हटले आहे. काँग्रेस गेल्या 10 वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. यामुळे आता भाजपला सत्तेपासून दूर ठेवून कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळवण्याचा त्यांचाही प्रयत्न असेल. अशा एकूण परिस्थितीत, सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत त्या नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याकडे...

याचे कारण असे की, नितीश कुमार यापूर्वीही अनेक वेळा इकडून-तिकडे गेले आहेत. बुधवारी सकाळी पाटण्याहून दिल्लीला पोहोचलेल्या विस्ताराच्या फ्लाइटमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव पुढे-मागे बसलेले दिसले, हाही चर्चेचा विषय ठरला. यामुळे आता सर्वांचीच नजर जागांच्या समीकरणावर आहे. नितीश कुमार एनडीएमधून पुन्हा I.N.D.I.A. सोबद गेले तर मोदी सरकारचे काय होईल? अशा चर्चाही होताना दिसत आहेत. या निवडणुकीत एकूण 12 जागा मिळाल्याने नितीश कुमार यांचे महत्वा अधिक वाढले आहे. मात्र, नितीश कुमार यांनी पलटी मारली आणि ते I.N.D.I.A. सोबत गेले, तरीही I.N.D.I.A. सरकार स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या 272 जागांपर्यंत पोहोचत नाही.

एकनाथ शिंदेही भाजपसाठी महत्वाचे -नितीश यांच्या जाण्याने भाजपला नक्कीच धक्का बसेल. मात्र, इतर अनेक मित्रपक्षांच्या मदतीने ते सत्तेवर येऊ शकतात. भाजपला एकूण 240 जागा मिळाल्या आहेत. तर चंद्राबाबू नायडूंना 16 जागा मिळाल्या आहेत. या दोहोंची बेरीज केल्यास, आकडा 256 वर जातो. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेही 7 खासदार आहेत. अशा प्रकारे संख्या 263 होते. स्वत:ला मोदींचे हनुमान म्हणवून घेणाऱ्या चिराग पासवान यांच्याकडेही 5 खासदार आहेत. यासह आकडा 268 वर पोहोचतो. तसेच, आंध्रच्या जनसेनेला 2, जयंत चौधरी यांच्या आरएलडीला दोन, अपना दल आणि अजित पवार यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. यांसह हा आकडा 274 वर पोहोचतो. हा आकडा सरकार स्थापनेसाठी लागणाऱ्या मॅजिक फिगरपेक्षाही दोनने अधिक आहे. 

यांची साथही महत्वाची - याशिवाय, पंजाबमध्ये भाजपचा सहकारी पक्ष राहिलेल्या अकाली दलानेही एक जागा जिंकली आहे. भाजपने प्रयत्न केल्यास त्यांची साथ मिळू शकते. जीतनराम मांझी यांचा पक्ष HAM आणि आसाममधील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आसाम गण परिषदेनेही एक जागा जिंकली आहे. या सर्वांचे सहकार्य मिळाल्यास एनडीएचा एकूण आकडा 277 वर पोहोचतो. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूEknath Shindeएकनाथ शिंदे