भयंकर घटना! वारंगलमध्ये रेल्वे ट्रॅकचे रॉड ट्रकमधून ऑटोवर पडले, ७ जणांचा मृत्यू, ६ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 17:56 IST2025-01-26T17:39:29+5:302025-01-26T17:56:45+5:30
तेलंगणातील वारंगलमध्ये मोठा अपघात झाला. रेल्वे ट्रॅकचे रुळ रिक्षावर पडले.

भयंकर घटना! वारंगलमध्ये रेल्वे ट्रॅकचे रॉड ट्रकमधून ऑटोवर पडले, ७ जणांचा मृत्यू, ६ जखमी
तेलंगणातील वारंगलमधील वारंगल-मामुनुरु रोडवर भीषण अपघात झाला आहे. एका लॉरी आणि दोन ऑटोरिक्षांची टक्कर झाल्याने एका मुलासह सात जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळांवर ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळ्यांनी भरलेल्या एका लॉरीने दोन ऑटोरिक्षांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोखंडी सळ्या ऑटोरिक्षावर पडल्या यामुळे सात जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये चार महिला आणि एक मुलगा होता.
सावधान! तुम्हाला मोठ्या अडचणीत आणू शकतं WhatsApp चं 'हे' खास फीचर
मिळालेल्या माहितीनुसार, वारंगलच्या उपनगरातील खम्मम दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील मामुनुरजवळ मोठा अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून जखमींपैकी तीन जणांवर उपचार सुरू आहेत. लॉरीचालक मद्य पिऊन वाहन चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. यामुळेच हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.
अचानक ब्रेक लावल्याने सळ्या रिक्षावर पडल्या
पोटाकुटीच्या ओरुगल्लूमध्ये एका मद्यधुंद ट्रक चालकामुळे हा अपघात झाला. चालकाने ट्रक वेगाने चालवला आणि एक भीषण अपघात झाला. वारंगलच्या उपनगरातील मामुनुरजवळ हा अपघात झाला. अचानक ब्रेक लावल्याने लॉरी उलटली. लॉरीमध्ये ठेवलेले लोखंडी सळई ऑटोवर पडल्या. यामुळे हा अपघात झाला.
या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण एका ऑटोमधून प्रवास करत असताना हा अपघात झाला. लॉरी चालक दारूच्या नशेत होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी लगेच घटनास्थळी पोहोचले, बचावकार्य सुरु केले. राष्ट्रीय महामार्गावर पडलेला लोखंडी रॉड जड क्रेनच्या मदतीने काढण्यात आला आणि लॉरी तेथून हलवण्यात आली. पोलिसांनी लॉरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.