कार आणि बसचा भीषण अपघात, कारमधील 5 जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 12:20 PM2021-09-15T12:20:07+5:302021-09-15T12:47:10+5:30

Accident News: भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर डझनभर प्रवासी जखमी झाले.

Horrific car and bus accident in jharkhand, 5 people burnt to death in the car | कार आणि बसचा भीषण अपघात, कारमधील 5 जणांचा होरपळून मृत्यू

कार आणि बसचा भीषण अपघात, कारमधील 5 जणांचा होरपळून मृत्यू

googlenewsNext

रांची:झारखंडच्या रामगढ जिल्ह्यातील राजराप्पा पोलीस स्टेशन परिसरातील मुरबंदा लारीजवळ बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. बुधवारी झालेल्या या भीषण अपघातात भरधाव बसने कारला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर दोन्ही वाहनांमध्येर आग लागली. यात कारमधील पाच जणांचा जळून मृत्यू झाला आहे. तर, बसमधील डझनभर प्रवासी जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, महाराजा नावाची एक प्रवासी बस रामगडहून धनबादकडे जात होती. ही बस समोरुन येणाऱ्या वॅगनार कारला धडकली. या अपघातात कार आणि बसमध्ये आग लागली. आग लागताच बसमधील प्रवासी बाहेर पडले आणि त्यांनी आपला जीव वाचवला. पण, कारमधील लोकांना बाहेर पडता आले नाही.

घटनेची माहिती मिळताच राजरप्पा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक विपीन कुमार घटनास्थळी पोहोचले. बस आणि कारमधील आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला रामगढहून पाचारण करण्यात आले आहे. अग्नीशमन दलाने कशीबशी आग विझविली पण तोपर्यंत उशीर झाला होता या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जळून मृत्यू झाला.

Web Title: Horrific car and bus accident in jharkhand, 5 people burnt to death in the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.