Honey trap gang busted in noida | हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नोएडा : हनी ट्रॅपमध्ये अडकवून लोकांना लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, सात जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, १४ जानेवारी रोजी मो. तौसीफ नामक व्यक्तीने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यात म्हटले होते की, त्याच्या भावाला १३ जानेवारी रोजी कोणीतरी फोन करून एफएनजी रोडवर बोलावले होते. त्यानंतर रात्री त्याला फोन आला होता की, त्याच्या भावाला काही लोकांनी बांधून ठेवले आहे. त्याला मारहाण करण्यात आली असून, एका महिलेवरील बलात्कार करण्याच्या प्रकरणात व्हिडिओ बनवून २ लाख रुपयांची मागणी करीत आहेत. याबाबतच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याच्या भावाला मुक्त केले. त्याला मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यात आली. यात दोन महिलांचा समावेश आहे. यावेळी पोलिसांनी कार, मोबाइल फोन, घटनेत वापरलेले तीन मोबाइल फोन व २०,००० रुपये जप्त केले. अटक केलेल्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यातून बाहेर आलेल्या माहितीनुसार, ही टोळी लोकांना हनी ट्रॅपमध्ये फसवीत असल्याची माहिती पुढे आली आहे, 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Honey trap gang busted in noida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.