शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

हनी सिंगला गँगस्टर गोल्डी ब्रारने दिली जीवे मारण्याची धमकी, हनीने केली सुरक्षेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 18:07 IST

गँगस्टर गोल्डी ब्रार सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. तो लॉरेन्स विश्नोईसोबत भारतात गँग चालवतो.

Honey Singh death threat: प्रसिद्ध रॅपर-सिंगर हनी सिंगला (Honey Singh) गँगस्टर गोल्डी ब्रारने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कॅनडामध्ये बसलेल्या कुख्यात गोल्डीने व्हॉईस नोट पाठवून धमकी दिली आहे. धमकी मिळाल्यानंतर हनी सिंगने दिल्लीपोलिसांच्या स्पेशल सेलकडे तक्रार केली आहे. सध्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हनी सिंगने सांगितले की, मला आणि माझ्या सहकाऱ्यांना गोल्डी ब्रारच्या नावाने धमकी दिली आहे. मी पोलिस आयुक्तांना भेटलो आणि त्यांना मला सुरक्षा पुरवण्याची विनंती केली आहे. मला खूप भीती वाटत आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं काही घडत आहे. माझे संपूर्ण कुटुंब घाबरले आहे. मी मृत्यूला खूप घाबरतो, त्यामुळे मी सुरक्षा देण्याची विनंती केली आहे, अशी माहिती हनीने दिली. 

कोण आहे गोल्डी ब्रार?

गोल्डी ब्रार हा पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसवाला हत्याकांडातील मुख्य आरोपी असून, सध्या फरार आहे. गोल्डी ब्रारचे पूर्ण नाव सतविंदरजीत सिंग आहे. त्यांचे कुटुंब मुक्तसर साहिबचे असून, तिथेच त्याचा 1994 मध्ये जन्म झाला. त्याने यापूर्वी बॉलिवूड स्टार सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. या वर्षी मार्चमध्ये त्याने सलमान खानला ईमेल पाठवून धमकी दिली होती. त्या धमकीनंतर पोलिसांनी सलमान खानच्या घराची सुरक्षा वाढवली.

तो सध्या कॅनडातून संपूर्ण टोळी चालवत असून, लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी मानला जातो. ब्रार विरुद्ध खून, हत्येचा प्रयत्न आणि खंडणी यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. एनआयएने त्याच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गोल्डी ब्रार आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई पंजाब, दिल्ली, राजस्थान, यूपी, हरियाणा येथे त्यांचे नेक्सस चालवतात.

टॅग्स :Honey Singhहनी सिंहdelhiदिल्लीPoliceपोलिसDeathमृत्यूbollywoodबॉलिवूड