Honest taxpayers! Modi will make a big announcement tomorrow Transparent Taxation | ईमानदार करदात्यांनो तुमच्यासाठी! मोदी उद्या मोठी घोषणा करणार

ईमानदार करदात्यांनो तुमच्यासाठी! मोदी उद्या मोठी घोषणा करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील ईमानदार करदात्यांसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म सुरु करणार आहेत. यासाठी उद्या मोठी घोषणा केली जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या आधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा 'ट्रान्सपरंट टॅक्सेशन- ऑनिरिंग द हॉनेस्ट' नावाची योजना लाँच करणार आहेत. 


एक फेब्रुवारीला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बजेटमध्ये टॅक्सपेअर चार्टरची घोषणा झाली होती. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या माहितीमध्ये सांगण्यात आले आहे की, या प्लॅटफॉर्मची सुरुवात प्रत्यक्ष कर सुधारण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्यमंत्री अनुराग ठाकूर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय विविध उद्योग मंडळांचे प्रतिनिधी, ट्रेड असोसिएशन, सीए असोसिएशन आणि करदाते देखील भाग घेतील. 


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याआधीही करदाते देशाचे निर्माते आहेत. सरकार त्यांच्यासाठी अधिकारांची भेट बहाल करणार आहे, असे म्हटले होते. इंडस्ट्रीला अधिकाधिक स्पर्धात्मक बनविण्याचा हा प्रयत्न आत्मनिर्भर भारताच्या अभियानाचा हिस्सा आहे. हे पॅकेज पीएम गरीब कल्याण योजना आणि आत्मनिर्भर भारत योजनेनंतरची मोठी घोषणा ठरणार आहे. याआधी आणल्या गेलेल्या योजना कोरोनाच्या झटक्यापासून इंडस्ट्रीला वाचविण्यासाठी होत्या. आता अर्थव्यवस्थेमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय अन्य काही घोषणाही करण्याची शक्यता आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

पुन्हा बिहार! नितीश कुमार आज उद्घाटन करणार होते; मेगा ब्रिजचा रस्ताच कोसळला

Gold Rate Today : सोन्या, चांदीचे दर गडगडले; कोरोना व्हॅक्सिनचा प्रभाव

OMG! न्युझीलंडवर कोरोनाचा छुपा वार; 102 दिवसांनंतर 4 नवे रुग्ण, ऑकलंड लॉकडाऊन

CoronaVaccine: कोरोना लसीवर रशियाचा शॉर्टकट धोक्याचा; जागतिक तज्ज्ञांचा गंभीर इशारा

पंतप्रधान मोदी लवकरच मोठ्या घोषणा करण्याची शक्यता; हे आहेत अंदाज

खतरनाक Video! WWE मध्ये नव्या सुपरस्टार्सची एन्ट्री; रिंगच तोडल्याने भरली धडकी

चिनी कंपन्यांवर आयकर विभागाचे छापे; 1000 कोटींचे हवाला 'घबाड' हाती लागले

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Honest taxpayers! Modi will make a big announcement tomorrow Transparent Taxation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.