शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

काश्मीरसंदर्भात अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई, 8 ट्विटर खाती बंद करण्याची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 9:04 PM

केंद्रीय गृह मंत्रालयानं जम्मू-काश्मीरमधल्या परिस्थितीसंदर्भात चुकीची माहिती देणं आणि अफवा पसरवणाऱ्या काही ट्विटर खात्यांना बंद करण्याची शिफारस केली आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय गृह मंत्रालयानं जम्मू-काश्मीरमधल्या परिस्थितीसंदर्भात चुकीची माहिती देणं आणि अफवा पसरवणाऱ्या काही ट्विटर खात्यांना बंद करण्याची शिफारस केली आहे. यात जवळपास आठ जणांच्या ट्विटर अकाऊंट्सचा समावेश आहे. ज्या खात्यांना बंद करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे, त्यात @kashmir787-Voice of Kashmir, @Red4Kashmir-MadihaShakil Khan, @arsched-Arshad Sharif, @mscully94-Mary Scully, @sageelaniii-Syed Ali Geelani, @sadaf2k19, @RiazKha61370907 आणि RiazKha723चा समावेश आहे.जम्मू-काश्मीरमधून काही दिवसांपूर्वीच अनुच्छेद 370 हटवण्यात आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर यासंदर्भात व्हायरल होणाऱ्या गोष्टींकडे सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे. जेणेकरून काश्मीर घाटीमध्ये शांततेचं वातावरण राहील. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये काही संघटना दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याचीही माहितीही समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांनीही हाय अलर्ट जारी केला आहे. भारतात दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयनं जैश-ए-मोहम्मदला हिरवा कंदील दाखवला आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी घोषित करण्यात आलेला मसूद अजहर जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आहे. जास्तीत जास्त जीवितहानी होईल अशा भागांमध्ये हल्ले करा, अशी सूचना आयएसआयकडून जैशला करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. घुसखोर दहशतवादी एखाद्या मशिदीवर हल्ला करू शकतात. त्यामुळे पाकिस्तानला भारतावर आरोप करण्याची संधी मिळेल, असा अंदाज सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.पोलीस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैशच्या सात दहशतवाद्यांनी बनिहालच्या दक्षिण आणि पीर पंजालच्या पर्वतील भागातून घुसखोरी केली आहे. सध्या हे दहशतवादी राजौरी किंवा पूँछमध्ये लपले असावेत, अशी शक्यता एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं व्यक्त केली. 'सात दहशतवादी अनंतनाग हायवे आणि त्याच्या आसपासच्या भागात हल्ले घडवू शकतात. त्यांच्याकडून नागरी वस्त्या आणि सुरक्षा दलांची कार्यालयं लक्ष्य केली जाऊ शकतात,' असा अंदाज दक्षिण काश्मीर दलातील सूत्रांनी वर्तवला.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-ए