शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 14:50 IST

गुरुग्राममधील बादशाहपूर विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेला संबोधित करताना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधला... 

हरियाणा विधानसभा निवडणूक प्रचारासाठी आता केवळ एक आठवडाच शिल्लक आहे. अशात सर्वच राजकीय पक्षाचे बडे नेते संपूर्ण ताकदीनिशी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. यातच गुरुग्राममधील बादशाहपूर विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेला संबोधित करताना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे. 

शाह म्हणाले, "इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी... काँग्रेस पक्षाच्या तीन पिढ्यांनी लष्कराचा सन्मान केला नाही. वन रँक-वन पेन्शनची मागणी पूर्ण केली नाही. आपण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केले आणि त्यांनी वन रँक वन पेन्शनची मागणी पूर्ण केली. पीएम मोदींनी वन रँक-वन पेन्शनचं तिसरं व्हर्जनही लागू केली आहे, आता नवीन पगारासह पेन्शन मिळेल"

अयोध्येतील जागा गमावल्यासंदर्भात काय म्हणाले अमित शहा? -लोकसभा निवडणुकीत अयोध्येच्या जागेवर भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. यासंदर्भात बोलताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले, "जागांवर जय-पराजय होतच असेत. त्याचा संबंध रामलल्लाच्या अपमानाशी जोडू नका. काँग्रेस पक्षाच्या राजवटीत रामलला तंबूत होते. पंतप्रधान मोदींनी भूमिपूजनही केले, मंदिरही बांधले आणि प्राणप्रतिष्ठाही पार पाडली.'' तत्पूर्वी, अयोध्येत भाजपचा पराभव झाला कारण त्यांनी रामलल्लाचा अपमान केला, असे विरोधक म्हणत होते.

अग्निवीर योजनेवरून काँग्रेसवर निशाणा -अमित शहा यांनी अग्निवीर योजनेसंदर्भातही काँग्रेसला प्रत्युत्तर दिले. शाह म्हणाले, "अग्नीवीर योजना केवळ तरुणांना सैनिक बनवण्यासाठी आहे. हरियाणातील प्रत्येक अग्निवीराला राज्य सरकार आणि भारत सरकार पेन्शन असलेली नोकरी दिणार. पाच वर्षांनंतर असा एकही अग्निवीर नसेल ज्याच्याकडे पेन्शन असलेली नोकरी नसेल." यावेळी शाह यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामाचा पाढाही वाचला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाAyodhyaअयोध्याHaryanaहरयाणाElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेस